ETV Bharat / bharat

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: वरिष्ठ आयपीएस अधिकारी बिहार पोलिसांच्या तपास पथकाच्या मदतीसाठी मुंबईत - बिहार पोलीस लेटेस्ट न्यूज

रविवारपर्यंत चार सदस्यांचे बिहार पोलिसांचे पथक मुंबई तपास करत होते. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिवारी यांना बिहार पोलिसांच्या पथकाला सहकार्य करण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले.

Bihar police
बिहार पोलीस
author img

By

Published : Aug 3, 2020, 9:41 AM IST

पाटणा(बिहार)- सुशांत सिंहच्आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात मतभेद दिसून आले आहे. यानंतर बिहार मधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना रविवारी मुंबई तपास पथकाला सहकार्य करण्यासाठी पाठवण्यात आले.

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी विनय तिवारी हे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपास पथकामध्ये सहभागी होतील, असे सांगितले.

रविवारपर्यंत चार सदस्यांचे बिहार पोलिसांचे पथक मुंबई तपास करत होते. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिवारी यांना बिहार पोलिसांच्या पथकाला सहकार्य करण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले.

मूळचा बिहारचा असलेला सुशांतसिंह राजपूत बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये 14 जून रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या खोलीत आढळून आला होता. या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहे.

बिहार पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचे सर्व सत्य समोर आणेल असा दावा गुप्तेश्वर पांडे यांनी केला. सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी 25 जुलै रोजी बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता.

रिया चक्रवर्तीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी पाटणा ऐवजी मुंबई येथे व्हावी, अशी याचिका दाखल केली. के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी प्रकरणाची चौकशी पाटणा येथेच व्हावी, अशी प्रतिवाद करणारी याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी 5 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती च्या फ्लॅटवर भेट दिली. मात्र, तेथे ती आढळून आली नाही. रिया चक्रवर्तीच्या घरी भेट दिल्यानंतर ती कोणत्या ठिकाणी आहे याचा पत्ता लागत नाही, असे बिहार पोलिसांनी सांगितले.

रिया चक्रवर्ती ने यापूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करत या प्रकरणी आपण निर्दोष आहोत असे जाहीर केले. व्हिडिओवर बोलताना पांडे यांनी रियाने व्हिडिओतून निर्दोष असल्याचे सांगण्यापेक्षा बिहार पोलिसांसमोर तिचे म्हणणे मांडावे, असे मत व्यक्त केले.

रियाने तिची बाजू मांडावी आमचे तिच्याशी काही वैर नाही जर ती असे सातत्याने बाजू मांडण्यापासून पळ काढणार असेल तर तिच्यासाठी ते अडचणी वाढवणारे ठरेल. बिहार पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत असून ज्या दिवशी पुरावा सापडेल त्या दिवशी आम्ही आरोपींना कुठूनही शोधून काढू बिहार पोलीस त्यासाठी सक्षम आहेत, असे पांडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.