नवी दिल्ली - ‘शिक्षा मित्र’ पदाच्या तब्बल 37 हजार 349 रिक्त जागा भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायाने उत्तरप्रदेश सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एम. एम. शांतनागोदूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा निर्णय दिला. शिक्षा मित्र पदासाठी परीक्षा झाली असून या जागा लवकरात लवकर भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मागच्या आठवड्यात शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता शिक्षा मित्र पदांची भरती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
21 मे ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत नोटीस जारी केली होती. 69 हजार प्राथिमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया जलद करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संघटनेने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने नोटीस जारी केली होती. मात्र, परिक्षार्थ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षक भरती वादात
उत्तरप्रदेशात 69 हजार प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु आहे. या परिक्षेचा निकाल आहे. मात्र, अनेकांनी प्रशपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे न्यायालयाने या निवडप्रक्रियेवर स्थगिती आणली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ज्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले आहेत. त्याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी भरती प्रक्रियेतील गोंधळावरून उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली होती.