ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने दोषी विनय गुप्ताची याचिका फेटाळली - Pawan Gupta Case

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा पवनने केला होता.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण
author img

By

Published : Mar 19, 2020, 2:44 PM IST

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा पवनने केला होता. यासंबधीची एक याचिका न्यायालयाने आधीच फेटाळली होती. मात्र, आता पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली होती. ती आज न्यायालयाने फेटाळली.

  • Supreme Court dismisses the curative petition of one of the convicts in the 2012 Delhi gang-rape and murder case, Pawan Gupta, against the dismissal of his review plea rejecting his juvenility claim. pic.twitter.com/hSvHh4Hg8y

    — ANI (@ANI) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना उद्या २० मार्चाला फाशी देण्यात येणार आहे. मात्र, आरोपींनी कायदेशीर मार्गांचा वापर करत ३ वेळा डेथ वॉरंट रद्द केला. त्यामुळे तिन्ही वेळा फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. न्यायालयाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात चौघांना फाशी देण्यात येणार आहे.

दोषी मुकेश सिंहची याचिका बुधवारी फेटाळली

गुन्हा घडला तेव्हा दिल्लीमध्ये नसल्याचा दावा मुकेश सिंहने याचिकेत केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका काल फेटाळली. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय सदोष असून यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजेश सेठी यांनी मत नोंदविले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.