ETV Bharat / bharat

आगामी लोकसभा निवडणुका 'ईव्हीएम'च्याच माध्यमातून - मुख्य निवडणूक आयुक्त - CPI

देश १७ व्या लोकसभा स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम बद्दल सामान्य मतदाराच्या मनात अनेक संभ्रम आहेत. अशातच मागच्या महिन्यात अमेरिकेमध्ये सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड करता येऊ शकतो, असे जाहीर पत्रकार परिषदेतून सांगितले होते. त्यामुळे ईव्हीएम बद्दल भ्रम अधिकच बडावला आहे.

सुनील अरोरा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना
author img

By

Published : Mar 5, 2019, 9:33 PM IST

नवी दिल्ली - एकीकडे आगामी लोकसभेला फारच कमी कालावधी उरलेला आहे. तर, दुसरीकडे ईव्हीएमच्या वैधतेवर देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे, असे असतानाही निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच होतील, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिले. ते नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकांवरही मत व्यक्त केले.

देश १७ व्या लोकसभा स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम बद्दल सामान्य मतदाराच्या मनात अनेक संभ्रम आहेत. अशातच मागच्या महिन्यात अमेरिकेमध्ये सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड करता येऊ शकतो, असे जाहीर पत्रकार परिषदेतून सांगितले होते. त्यामुळे ईव्हीएम बद्दल भ्रम अधिकच बडावला आहे. मात्र, या निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातूनच होतील, असे अरोरा यांचे म्हणणे आहे.

Sunil Arora
सुनील अरोरा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना

मागच्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकानंतर ईव्हीएमचा अनेक निवडणुकांमध्ये उपयोग झाला. दिल्ली, कर्नाटक आणि नुकतेच ४ राज्यांमधील निवडणुका या यशस्वीपणे पार पडल्या. या निवडणुकांमध्ये वेग-वेगळे पक्ष विजयी झाले. तसेच त्यांना पडलेल्या मतांमध्ये मोठा फरक होता. यावरून ईव्हीएमच्या वैधतेवर आक्षेप घेता येणार नाही, असे अरोरा म्हणाले. आगामी निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातून होतील. यामध्ये शंकाच नाही, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. तेथे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची गरज आहे. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबतच होणार का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तेथे निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी एकत्र निवडणुका घेण्यास सहमती दर्शवली तर, आपल्याला लोकसभेसोबत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील, असे अरोरा यांनी सांगितले.

Intro:Body:

KESARI SONG PKG_ASHVINI.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.