जबलपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोक त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. मात्र, असे असतानाही लोक तणाव आणि नैराश्याला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोक आत्महत्येसारखी पावले उचलत आहेत. जबलपूरमध्ये 50 दिवसात 51 जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये 29 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे.
सैन्याच्या जवानाची पत्नीसह आत्महत्या -
जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका सैनिकाने आपल्या पत्नीला गळफास लावून स्वतःही आत्महत्या केली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन झाले नसल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, एका आईनेही मुलाच्या मृत्यूमुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
ओव्हरडोसमुळे नर्सचा मृत्यू -
जबलपूरमधील खासगी रुग्णालयातील रेवा येथील एका परिचारिकेने 6 मे रोजी इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली आहे. तर भेडाघाटातील एका 67 वर्षीय वृद्धानेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याशिवाय माढौली येथील तरूणानेही रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. तसेच 18 वर्षाच्या तरुणीनेही गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आत्महत्येचे कारण बनले तणाव -
लॉकडाऊन दरम्यान, आत्महत्येच्या बर्याच घटनांमध्ये तणावाखाली जीवन जगणारे आणि प्रियजनांपासून दूर राहिल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 5 एप्रिल रोजी एका 27 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर 22 मार्चला एका युवकाने स्वत: ला गळफास लावून घेतला. याशिवाय मांझौली येथे पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली.
50 दिवसात 51 आत्महत्या -
50 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये 51 आत्महत्येच्या घटनांनी पोलिसांची झोप उडाली आहे. यावर एसपी सिद्धार्थ बहुगुणा म्हणाले की, लॉकडाऊनच्या दरम्यान आत्महत्या करणे ही चौकशीची बाब आहे. त्याच वेळी मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वप्निल अग्रवाल यांनी असे म्हटले आहे की, अलीकडच्या काळात आत्महत्या करण्यामागे नशा करणे हे एक प्रमुख कारण बनले आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना दारु किंवा नशेच्या वस्तू मिळत नसल्यामुळे आत्महत्या वाढत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.