नवी दिल्ली - राजधानीतलं वातावरण चांगलंच तापलं असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे निर्दशने रोखण्यासाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ आणि दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हॉस्टेलसाठीचे नवे नियम ,शासनाने फीमध्ये केलेली वाढ यांना विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ही फी वाढ आणि जाचक नियम तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.