नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी आज (गुरुवारी ) होणार आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्ट रोजी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत आपला आदेश सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय याचा निर्णय आज सुप्रीम कोर्ट देऊ शकते.
सुशांतसिंह राजपूत ( वय 34) याने मुंबईत 14 जूनला आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस तेव्हापासून करत आहे. या प्रकरणी बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या मुळे बिहार पोलीसपण तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाले आहेत. याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर गुरुवारी होणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती ए. एस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमण्यम यांचा समावेश आहे.