ETV Bharat / bharat

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : २४ जणांना अटक, मृतांमध्ये १७ विदेशी नागरिक, आयफेल टॉवरकडून आदरांजली

कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत. हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

author img

By

Published : Apr 22, 2019, 8:45 AM IST

Updated : Apr 22, 2019, 1:41 PM IST

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट

नवी दिल्ली - श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २०७ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ४५० जण जखमी झाले. यातील १७ परदेशी नागरिकांची ओळख पटविण्यात यश आले आहे. यात ३ भारतीयांचा समावेश आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यानंतर कोणत्याही प्रकारच्या मानवीय सहाय्याची तयारी भारताने दर्शवली आहे.

श्रीलंका बॉम्बस्फोट व्हिडिओ

रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले. बचावकार्यास सुरुवात झाल्यानंतर जखमींना कोलम्बो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी आज सकाळी ६ वाजता उठवण्यात आली आहे.

या घटनेतील मृतांना आदरांजली देण्यासाठी पॅरिस (फ्रान्स)मधील आयफेल टॉवरवरील रोषणाई मध्यरात्री बंद करण्यात आली.

कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.

कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत.
हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 22, 2019, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.