ETV Bharat / bharat

सिकंदराबादमध्ये पोलीस हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या - सिकंदराबाद स्व:तवर गोळी झाडून आत्महत्या

सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांना सकाळी एक पोलीस रक्त्याच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

सिकंदराबाद
सिकंदराबाद
author img

By

Published : Nov 1, 2020, 6:18 PM IST

सिकंदराबाद - विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीएफ) हवालदाराने रविवारी सकाळी सिकंदराबाद येथे आपल्या रायफलने स्व:तवर गोळी झाडून आत्महत्या केली. मधु असे त्या हवालदाराचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांना सकाळी एक पोलीस रक्त्याच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

माहिती मिळाल्यानंतर महांकाली पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासणीनंतर मृतदेह उस्मानिया सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मात्र, हवालदाराच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा हवालदार मूळचा बाथळपल्लीचा असून त्याच्या पाठीमागे पत्नी व मुले असा परिवार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.