ETV Bharat / bharat

Etv Bharat Exclusive : हा तर निर्लज्जतेचा कळस..! कमलनाथांवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा हल्लाबोल - कमलनाथ इमरती देवी वक्तव्य

माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकारण तापले आहे. हे फक्त राजकीय वक्तव्य नसून यातून काँग्रेसची महिलांबाबची मानसिकता दिसून येते, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 20, 2020, 7:01 PM IST

भोपाळ - माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकारण तापले आहे. एकीकडे काँग्रेस या वक्तव्यावरून स्पष्टीकरण देत असतानाच भाजपा आणखीनच आक्रमक झाला आहेत. ज्या पद्धतीने वक्तव्य केले आणि त्यावर स्पष्टीकरण दिले, हा निर्लज्जतेचा कळस आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले. या वादानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करताना

हे फक्त राजकीय वक्तव्य नसून यातून काँग्रेसची महिलांबाबतची मानसिकता दिसून येते. अशा प्रकारचे वक्तव्य निर्लज्जपणा आणि बेशर्मीचा कळस आहे. कोणत्याही महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे हे राजकारण नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. दरम्यान, कमलनाथ यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर जीव देण्याचा इशारा इमरती देवी यांनी ग्वाल्हेरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिला. इमरती देवी यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. त्या(इमरती देवी) काय करणार हा त्यांचा विचार आहे. मात्र, राज्यात महिलांचा अमपान सहन केला जाणार नाही, असे चौहान म्हणाले.

डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना 'आयटम' म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ उडाली. भाजपाने या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी केली आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन तासाचे मौन पाळले होते. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.