ETV Bharat / bharat

...म्हणून झाले विनाशकारी दुसरे महायुद्ध - दुसरे जागतिक महायुद्ध कारणे विशेष स्टोरी

१९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या विनाशकारी महायुद्धाला २ सप्टेंबर २०२०ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हे महायुद्ध होण्यामागे असलेल्या कारणांचा आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...

Second World War
दुसरे महायुद्ध
author img

By

Published : Sep 2, 2020, 7:30 AM IST

एकोणिसाव्या शतकात जगाने दोन महायुद्धे पाहिली. सत्ता स्पर्धा आणि जागतिक राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी या महायुद्धामध्ये सहभाग घेतला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या विनाशकारी महायुद्धाला २ सप्टेंबर २०२०ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरे जागतिक महायुद्ध होण्यामागे कोणती कारणे होती याची बाबत घेतलेला हा आढावा...

१) जर्मनीचे परराष्ट्र धोरण - दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर म्हणजेच १९३५ नंतर जर्मनीने आक्रमक परराष्ट्र धोरण स्विकारण्यास सुरुवात केली. हिटलरने लुफ्तवॅफ या हवाईसेनेची सुरुवात करून सक्तीची सैन्यभरती सुरू केली. त्यामुळे साहजिकच इतर देशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पुढे १९३९ला जर्मनीने पोलंडवर थेट आक्रमण करत दुसऱ्या महायुद्धाचा पाया घातला. जर्मनीने व्हर्सायच्या तहाचे उल्लंघन करत साम्राज्यविस्ताराला केलेली सुरुवात देखील महायुद्धाला कारणीभूत ठरली.

२) पहिल्या महायुद्धानंतरच्या घडामोडी - पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायचा तह करण्यात आला. तहाबाबत जर्मनीच्या मनात असंतोष होता. कारण यामुळे जर्मचा आकार कमी झाला. याचा तेथील समाज जीवनावर आणि आर्थिक बाबींवर मोठा परिणाम झाला. आर्थिक सुबत्ता आणण्याचे व साम्यवादाचा विरोध करण्याचे आश्वासन हिटलरने जर्मन जनतेला दिले. त्यामुळे त्यांनी हिटलरला एकहाती सत्ता बहाल केली. त्यानंतर हिटलरने नाझीवादाचा अतिरेक करून जर्मनीला आणि पर्यायाने सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले.

३) जर्मनीच्या परराष्ट्रीय धोरणाकडे केलेले दुर्लक्ष - जर्मनीने व्हर्सायच्या तहाचे उल्लंघनकरून आक्रमक धोरण अवलंबने सुरू केले. मात्र, इतर राष्ट्रांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे जर्मनीचे मनोधैर्य आणखी वाढत गेले. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले होते. त्यामुळे त्यांनी जर्मनीला उघडपणे विरोध करणे टाळले. विशेषकरून ग्रेट ब्रिटनला दुसरे महायुद्ध नको होते.

४) सोव्हिएत युनियन आणि युनायटेड स्टेट्सचे दुर्लक्ष - युरोपीय देशांव्यतिरिक्त सोव्हिएत युनियन आणि युनायटेड स्टेट्स या दोन बड्या राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रियता न दाखवल्याने दुसरे महायुद्ध होण्याला चालना मिळाली. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापर्यंत ही दोन्ही बडी राष्ट्रे जागतिक राजकारणात अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी युरोपात होणाऱ्या घडामोडींकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. याचा सर्वात जास्त फायदा जर्मनीने घेतल्याने दुसरे महायुद्ध झाले.

५) अक्ष राष्ट्रांची निर्मिती - १९३०च्या दशकात लहान-मोठ्या घडामोडी होऊन युरोपात गटातटाचे राजकारण सुरू झाले. १९३६ ते १९३९ या काळात झालेले स्पॅनिश सिव्हील वॉर जर्मनी आणि इटलीच्या एकत्र येण्यास कारणीभूत ठरले. इटलीचा बेनिटो मुसोलीनी आणि जर्मनीचा अडॉल्फ हिटलर यांचे एकत्र येणे जागतिक राजकारणासाठी सर्वात मोठा धोका ठरले. त्यामध्ये १९३६ साम्यवादी विरोधी जपानने आपला सहभाग घेतला. या तीन देशांच्या गटाला अक्ष राष्ट्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. या सत्तांच्या एकत्र येण्याने दुसरे महायुद्ध सुरू होण्यास एक प्रकारे मदतच झाली.

६) मित्र राष्ट्रांचे अपयश - साम्यवादी सोव्हिएत युनियन आणि नाझी जर्मनी ही दोन्ही राष्ट्रे वैचारिकदृष्ट्या एकमेकांचे शत्रू आहेत. मात्र, तरीही त्यांनी एकत्र येत करार करून एकमेकांवर आक्रमण न करण्याचा करार केला. जेव्हा जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले त्याच वेळी सोव्हिएत युनियनने पूर्वेकडून पोलंवर आक्रमण केले. ही घटना दुसरे महायुद्ध सुरू होण्यात महत्त्वाची ठरली. कारण पुढे जाऊन जर्मनीने सोव्हिएत युनियनलाही न जुमानता आपले पोलंडवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सने पोलंडच्याबाजूने युद्धात उडी घेतली. मात्र, फ्रान्सच्या हालचाली अतिशय संथ होत्या. अमेरिकेने मित्र राष्ट्रांना आर्थिक मदत तर पुरवली मात्र, जपानचा हल्ला होऊपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला होता. एकूणच मित्र राष्ट्रांचा एकमेकांसोबत असलेला ताळमेळ दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.