जयपूर - काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयातील खंडपीठात आज (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांवर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत.
विधानसभा अध्यक्ष आणि सचिन पायलट यांच्या पक्षामार्फत त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात एक सहमती पत्र दाखल केले आहे. या सहमती पत्रात विधानसभा अध्यक्षही शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुनावणी करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी सुनावणी 5 वाजेपर्यंत स्थगित केली आहे. यामुळे 5 वाजेपर्यंत बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही. यामुळे न्यायालयात शुक्रवारी 1 वाजता या प्रकरणाची सुनावणी व्हावी. यानंतर सचिन पायलट आणि अन्य बंडखोर आमदारांनीही या पत्राला सहमती दर्शवली आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसेच जर न्यायालयाकडून आमदारांना दिलासा मिळाला तर विधानसभा अध्यक्ष त्या निर्णयाशी बांधिल राहतील. हा आमदारांना मोठा दिलासा राहील.
या आमदारांना पाठवण्यात आली आहे नोटीस -
सचिन पायलट, रमेश मीणा, इंद्राज गुर्जर, गजराज खटाना, राकेश पारीक, मुरारी मीणा, पी.अर.मीणा, सुरेश मोदी, भंवर लाल शर्मा, वेदप्रकाश सोलंकी, मुकेश भाकर, रामनिवास गावड़िया, हरीश मीणा, बृजेन्द्र ओला, हेमाराम चौधरी, विश्वेन्द्र सिंह, अमर सिंह, दीपेंद्र सिंह और गजेंद्र शक्तावत.