ETV Bharat / bharat

'देश संकटात असताना पंतप्रधान राव यांच्या नेतृत्त्वामुळं आव्हाने पेलता आली' - सोनिया गांधी

राव यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत देशाने राजकीय, सामाजिक आणि परराष्ट्र नितीमध्येही यश मिळवले. ते एक सच्चे काँग्रेस नेते होते. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने राव यांची जन्मशताब्दी वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Jul 24, 2020, 6:28 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज(शुक्रवार) माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाला उजाळा दिला. आधुनिक भारताच्या निर्मितीत राव यांचे धडाडीचे नेतृत्व, योगदान आणि त्यांच्या यशाचे कौतुक दोन्ही नेत्यांनी केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त हुशार आणि विद्वान व्यक्तिमत्व असलेल्या राव यांना सोनिया गांधींनी आदरांजली वाहिली.

'राज्य आणि केंद्रात अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात राहिल्यानंतर देशावर आर्थिक संकट असताना राव पंतप्रधान बनले. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे भारताने अनेक आव्हाने पेलली. 24 जुलै 1991 साली मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने देशात आर्थिक परिवर्तन घडून आले, असे सोेनिया गांधी म्हणाल्या.

राव यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत देशाने राजकीय, सामाजिक आणि परराष्ट्र नितीमध्येही यश मिळवले. ते एक सच्चे काँग्रेस नेते होते. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने राव यांची जन्मशताब्दी वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पी. व्ही नरसिंह राव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व होते, असे गांधी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनीही तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे धन्यवाद मानले. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणारे राव यांचे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. किशोरवयात असताना काँग्रेस पक्षाशी जोडलेे गेलेले राव यांचा पंतप्रधान पदापर्यंतचा राजकीय प्रवास धर्य आणि निर्धाराचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 24 जुलैला 1991 च्या अर्थसंकल्पाला 29 वर्ष पूर्ण झाले. या दिवसानंतर भारताने आर्थिक परिवर्तनाच्या नव्या मार्गावर वाटचाल सुरु केली. राव आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी देशात उदारीकऱणात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राहुल गांधी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.