ETV Bharat / bharat

भारत बचाओ रॅली : 'देशात भांडणे पेटवून मूळ मुद्यांना बगल देणं हाच भाजपचा डाव'

रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने आज 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Dec 14, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली - रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने आज 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली. मोदींना संविधानांची, संसदेची पर्वा नसून त्याचे फक्त देशातील लोकांमध्ये मतभेद निर्माण करून मूळ मुद्यांना बगल देणे हेच भाजपचे लक्ष्य आहे, असे त्या म्हणाल्या.

सध्या देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे आपण घराबाहेर पडून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कधी-कधी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपते. आपल्या देशाला वाचावयाचे असेल तर कठोर संघर्ष करावा लागेल, असे सोनिया गांधी भाषणाच्या सुरवातीला म्हणाल्या.

मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली असून देशातील तरुणांचे भविष्य अंधकारात आहे. शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण झाले असून त्यांच्या पिकांना भाव मिळत नसून त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज मजुरांना काम मिळत नाही. लहान मोठ्या उद्योजक अडचणीचा सामना करावा लागत असून ते कर्ज बाजारी झाले आहेत, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

देशातील महिलांना कुटुंब साभाळण्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. या सर्व प्रकारामुळे मान लाजेने खाली जात आहे. अंधेरी नगरी चौपट राजाच्या या नियोजनामुळे सर्व काही बिघडले असल्याची टीका त्यांनी केली.

काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोट बंदी केली. तो का आला नाही, तो कुठे आहे, अच्छे दिन कुठे आहेत?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. देशातील नागरिकांचा पैसा बॅकामध्ये सुरक्षीत नाही. एकिकडे भाजप संविधान दिवस साजरा करण्याचा कांगावा करते. तर दुसरीकडे रोज संविधानाचे धिंडवडे काढत आहे. सध्या कॅब वरून देशात आराजकता माजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, देश असल्या अन्याय कारक गोष्टीला थारा देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मोदी-शाह सरकारला संसंदेची चिंता नाही. संविधानिक संस्थांची परवा नाही. त्यांचे फक्त राजकारणावर लक्ष्य आहे. लोकांमध्ये भांडणे लावा आणि महत्वाचे मुद्दे लपवणे हा त्यांचा एकच उद्देश आहे. मात्र आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी कोणतीही किमंत मोजायला तयार आहोत. केवळ जनतेच्या हितासाठी काँग्रेसने लढाई दिली आहे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करू, असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने 15 नोव्हेंबरपासून देशभरातील विविध भागांत आंदोलने सुरू केली आहेत. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर भारत बचाव रॅली काढण्यात आली आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या भारत बचाओ रॅलीने होणार आहे.

Intro:Body:

भारत बचाओ रॅली : 'देशात भांडणे पेटवून मूळ मुद्यांना बगल देण हाच भाजपचा डाव'

नवी दिल्ली -  रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने आज 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली. मोदींना संविधानांची, संसदेची पर्वा नसून त्याचे फक्त देशातील लोकांमध्ये मतभेद निर्माण करून मूळ मुद्यांना बगल देणे हेच भाजपचे लक्ष्य आहे, असे त्या म्हणाल्या.

सध्या देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे आपण घराबाहेर पडून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कधी-कधी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपते.  आपल्या देशाला वाचावयाचे असेल तर कठोर संघर्ष करावा लागेल, असे सोनिया गांधी भाषणाच्या सुरवातीला म्हणाल्या.

मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली असून देशातील तरुणांचे भविष्य अंधकारात आहे. शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण झाले असून त्यांच्या पिकांना भाव मिळत नसून त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज मजुरांना काम मिळत नाही. लहान मोठ्या उद्योजक अडचणीचा सामना करावा लागत असून ते कर्ज बाजारी झाले आहेत, असे सोनिया गांधी म्हणल्या.

देशातील महिलांना कुटुंब साभाळण्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. या सर्व प्रकारामुळे मान लाजेने खाली जात आहे. अंधेरी नगरी चौपट राजाच्या या नियोजनामुळे सर्व काही बिघडले असल्याची टीका त्यांनी केली.

काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोट बंदी केली. तो का आला नाही, तो कुठे आहे, अच्छे दिन कुठे आहेत?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. देशातील नागरिकांचा पैसा बॅकामध्ये सुरक्षीत नाही. एकिकडे भाजप संविधान दिवस साजरा करण्याचा कांगावा करते. तर दुसरीकडे रोज संविधानाचे धिंडवडे काढत आहे. सध्या कॅब वरून देशात आराजकता माजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, देश असल्या अन्याय कारक गोष्टीला थारा देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मोदी-शाह सरकारला संसंदेची चिंता नाही. संविधानिक संस्थांची परवा नाही. त्यांचे फक्त राजकारणावर लक्ष्य आहे. लोकांमध्ये भांडणे लावा आणि महत्वाचे मुद्दे लपवणे हा त्यांचा एकच उद्देश आहे. मात्र आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी कोणतीही किमंत मोजायला तयार आहोत. केवळ जनतेच्या हितासाठी  काँग्रेसने लढाई दिली आहे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करू असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.