ETV Bharat / bharat

धक्कादायक! पैशासाठी मुलाने चिरला आपल्याच पित्याचा गळा

पैसे देत नाही आपल्याच पित्याचा मुलाने गळा चिरला असल्याची घटना किशनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलीस ठाणे बातमी
पोलीस ठाणे बातमी
author img

By

Published : Oct 14, 2020, 1:46 PM IST

नवी दिल्ली - गुन्हेगारांसोबत मैत्री केल्याने वडिलांनी खर्चाचे पैसे न दिल्याने मुलाने आपल्याच बापाचा गळा चिरल्याची घटना नवी दिल्लीच्या किशनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत आरोपीच्या आईने आपल्या दुसऱ्याला मुलाला फोन करत माहिती दिली. त्यानंतर दुसरा मुलगा जखमी पित्यास रुग्णालयात घेऊन गेला.

पैशासाठी मुलाने चिरला आपल्याच पित्याचा गळा

किशनगड पोलिसांनी जखमी श्रीनाथच्या धाकट्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमी श्रीनाथ अपल्या पत्नी व तीन मुलांसह किशनगड परिसरात भाड्याच्या घरात राहतात.

श्रीनाथ आईटीओ स्थित आयकर विभागामध्ये कामाला आहेत. त्यांचा मोठा मुलगा वीरेंद्र हा व्यसानाधीन होता. त्यामुळे सतत भांडण-तंटे करत होता. त्यामुळे श्रीनाथ यांनी त्याला खर्चासाठी पैसे बंद केले होते. त्यामुळे तो पित्यावर चिडून होता.

आरोपीचा शोध सुरू

12 ऑक्टोबरला सायंकाळी वीरेंद्र घरी येऊन भांडण करू लागला. त्यानंतर त्याने आपल्या पित्यास मारहाण सुरू केली. मारहाण झाल्यानंतर त्याने घरातील सुरा घेत श्रीनाथ यांचा गळा चिरला. त्यानंतर तो पळून गेला. त्याच्या शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा - तेलंगाणात मुसळधार पावसाचा इशारा, हैदराबादसह संपूर्ण राज्यात सतर्कतेचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.