ETV Bharat / bharat

धक्कादायक..! घोरणाऱ्या वडिलांचा मुलाने केला खून - घोरणाऱ्या वडिलांना मारहाण

रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्याने वडिलांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांनीही जागे झाल्यावर त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत राम स्वरूप गंभीर जखमी झाले.

दवाखान्यातील छायाचित्र
दवाखान्यातील छायाचित्र
author img

By

Published : Aug 13, 2020, 3:58 PM IST

पीलीभीत (उत्तर प्रदेश) - घोरणाऱ्या लोकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. गाढ झोपेत जोरजोरात घोरणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेहरामऊ उत्तरी गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असून घटनेनंतर मुलगा फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रामस्वरूप नावाच्या व्यक्तीची नवीन आणि मुकेश अशी दोन मुले आहेत. नवीन नेहमी दारूच्या नशेत तर्र असतो. त्या रात्री रामस्वरूप आणि मुकेश हे दोघेच घरात होते. झोपेत रामस्वरूप हे मोठ-मोठ्याने घोरत होते. त्यामुळे मुकेशला त्याचा त्रास होत होता. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्याने वडिलांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांनीही जागे झाल्यावर त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत राम स्वरूप गंभीर जखमी झाले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारील लोकांनी रामस्वरूप यांना पुरणपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घरात जाऊन चौकशी केली असता मुलगा घरातून फरार झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत रामस्‍वरूप हे घरात झोपले असताना त्यांच्या डोक्यात मुकेशने काठीने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. झोपेत रामस्वरूप हे घोरत असल्यामुळे त्रास होत असल्याने मुकेशने त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत, असे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यादव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.