ETV Bharat / bharat

कोरोना दहशत : सोरठी सोमनाथ मंदिर राहणार 31 मार्चपर्यंत बंद

भारतामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 184 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले सोरठी सोमनाथ मंदिर हे 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे.

author img

By

Published : Mar 19, 2020, 7:36 PM IST

Somnath Jyotirling Temple Closed For Devotees till 31st March Due To Corona Outbreaks

वेरावळ - कोरोना विषाणूने जगभरामध्ये दहशत पसरवली असून भारतामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 184 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले सोरठी सोमनाथ मंदिर हे 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे.

सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. गुजरातच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे.

देशातील सर्व देवस्थानांना मंदिर बंद ठेवण्याचे आवाहन सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईसंस्थाननेही बाबांचे दर्शन बंद केले आहे. केवळ ऑनलाईन दर्शन दिले जात आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरही बंद करण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता श्री माता वैष्णोदेवी यात्रेलाही स्थगती देण्यात आली आहे.

भारतात आतापर्यंत सुमारे 184 पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली असून, 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणपणे १५ लोक बरेही झाले आहेत. सरकारने कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.