भुवनेश्वर (ओडिशा)- भाजपचे उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी ट्विटर वरुन बुधवारी खळबळजनक आरोप केला आहे. काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे पाकिस्तानी नागरिक आणि आयएसआयशी संबंधित लोकांशी व्यायवसायिक भागिदारी असल्याचा आरोप केला. ज्यांच्या सोबत कलाकारांचे आर्थिक संबध आहेत त्या पाकिस्तानी लोकांचा जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा देखील पांडा यांनी केला.
देशप्रेमी बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानी नागरिकांशी संबध असणाऱ्या कलाकारांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पांडा यांनी केले. मात्र, पांडा यांनी कलाकारांची नावे जाहीर केली नाहीत.
बॉलिवूड सध्या सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या, त्यानंतर सुरू झालेला घराणेशाहीचा वाद अशा वादातून जात असताना भाजपचे उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा बॉलिवूड सेलिब्रेटीबद्दल खळबळजनक आरोप केला आहे.