अॅरिस्टॉटलने असे म्हटले होते की माणूस हा स्वभावाने सामाजिक प्राणी आहे. सर्व मानव असे आहेत. म्हणून सामाजिक अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हे स्वभावाच्या विरूद्ध असल्याचे दिसते. व्यापक सामाजिक संदर्भात जसे की निवासाची जागा, घराचा प्रकार, उत्पन्न आणि उपजिविका आदीसह हा एक प्रमुख घटक आहे जो कोव्हिड १९ महामारीच्या संकटाच्या काळात सामाजिक अंतर राखणे हे आव्हान बनवतो.
तरीसुद्धा, महामारीसाठी कोणतीही लस किंवा उपचार नजीकच्या काळात तरी दृष्टिपथात दिसत नसल्याने, केवळ सामाजिक आणि वर्तनात्मक हस्तक्षेपच जसे की सामाजिक अंतर राखणे आणि हाताची स्वच्छता हे परिणामकारक खबरदारीचे उपाय आहेत. इतिहासापासून धडे हेच सूचित करतात की सामाजिक अंतर राखण्याचा उपयोग होतो. १९१८ च्या स्पॅनिश फ्ल्यूच्या उद्रेकाच्या काळात ते परिणामकारक ठरले होते. जगभरात अनेक देश कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याची अमलबजावणी महत्वाचा उपाय म्हणून करत आहे.
सामाजिक अंतर म्हणजे काय?
याचा अर्थ लोकांमध्ये शारीरिक अंतर ठेवून त्यायोगे आजाराचा प्रसार कमीत कमी करणे. सोशल डिस्टन्स हा शब्द मिथ्या आहे कारण त्यामुळे सामाजिक संपर्क तोडणे, किंवा सामाजिक स्तरानुसार भेदभाव पुन्हा लादणे असा अर्थ जातो. म्हणून डब्ल्यूएचओ सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरण्यास परावृत्त करत असून त्याऐवजी शारीरिक अंतर राखणे शब्दाचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे.
सोशल डिस्टन्सिंग कसे कराल?
शारीरीक अंतर राखणे हे महामारीच्या काळात लोकांना घरात रहायला, सामूहिकरित्या एकत्र जमण्यास टाळायला आणि एकमेकांपासून ३ ते ६ फूट दूर शारीरिक अंतर राखण्यास सांगून हे फिजिकल डिस्टन्सिंग लादले जाते. बहुतेक सरकारांनी सामूहिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक जागा आणि जीवनावश्यक सेवा वगळून सर्व संस्था बंद केल्या आहेत. लोकांना शारिरिक अंतर राखण्यासाठी सक्षम पर्यावरण तयार करण्यासाठी त्यांना घरून काम करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
ते कसे सहाय्यभूत ठरते :
शारिरिक अंतर राखणे अनेक स्तरांवर मदत करते.
१. रोगग्रस्त अवस्थेतील वृद्ध लोक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या उच्च जोखिम असलेल्या समूहांमध्ये संसर्गाची शक्यता कमी करते.
२.कोविड १९ महामारीच्या अवस्थांची प्रगती मंद करते. भारत सध्या दुसर्या अवस्थेत असून ज्याचा अर्थ विषाणुचं संक्रमण स्थानिक पातळीवर होत आहे. या अवस्थेत, संसर्गाचा स्त्रोत आणि त्याच्या प्रक्षेपमार्गावर नजर ठेवता येते. महामारीची वाटचाल तिसर्या अवस्थेकडे होऊ नये, हे रोखण्यासाठी शारिरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे आहे. सामुदायिक प्रसार ज्याचा अर्थ विषाणु आता समुदायात फिरत आहे आणि त्यामुळे संसर्ग झालेल्या आणि परिणाम झालेल्या लोकांच्या संख्येत अचानक प्रचंड वाढ होऊ शकते.
३.शारिरिक अंतर राखणे रूग्णांची संख्या कमी करण्यात मदत करते त्यायोगे हा आलेख सपाट केला जाऊ शकतो ज्याचा अर्थ आरोग्यसेवा प्रणालीचे अतिरिक्त ताण येण्यापासून संरक्षण केले जात आहे.
सामाजिक अंतर राखण्याची कल्पना अनेक संलग्न सामाजिक घटना आणि संकल्पना समोर आणते ज्या शारिरिक अंतर राखण्याच्या प्रयत्नांना संदर्भित करतात, असे मानले जाते.
सामाजिक बंधन सामाजिक अंतर राखण्याच्या काळात शक्य आहे. व्हिडिओ कॉलसारखे तंत्रज्ञान संपर्कात रहाण्यासाठी सहाय्यकारी ठरते आणि सामाजिक विलगीकरणाच्या काळात एकमेकांना समर्थन देते. कमकुवत अशा वृद्घ व्यक्तिंशी नियमित संपर्क साधणे त्यांच्या हिताची खात्री करण्यासाठी महत्वाचे आहे.
सामाजिक उपयुक्तः पारंपरिकदृष्ट्या आपण सामाजिक उपयुक्ततेच्या कल्पनेला मौल्यवान मानतो आणि मजबूत सामाजिक संबंधांवर यशस्वी होतो. म्हणून शारिरिक अंतर राखण्याच्या काळात समुदायाच्या कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी या गोष्टींकडे पुन्हा वळणे आणि त्यांची पुन्हा अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे.
महामारीच्या काळात समुदायाचा सहभाग आणि स्वयंसेवकत्वाला चालना दिल्यास त्याचा परिणाम सामाजिक सलोख्यात होतो. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आणि इतरांची काळजी घेण्यात योगदान देणे हे महत्वाचे आहे. सुदृढ, तरूण आणि संरक्षित यांच्यासह आपल्या सर्वांना भूमिका बजावायची आहे. कमकुवत समुदायांकडे लक्ष देऊ या.
सामाजिक कलंक बहुतेक महामारीच्या काळात राबवली जाते जेथे एक विशिष्ट जमात किंवा लोकांना जे विषाणुच्या संपर्कात आले आहेत त्यांच्याबाबतीत अस्पृष्यता पाळली जाते. सामाजिक कलंकामुळे लक्षण लपवण्याचे आणि खबरदारीच उपाय न पाळण्याचे प्रमाण वाढेल, हे ओळखणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही हस्तक्षेपामुळे संसर्गग्रस्त लोकांना अस्पृष्य म्हणून वागवण्याची शक्यता कमीत कमी झाली पाहिजे.
सामाजिक निकष बदलणे हे शारिरिक अंतर राखण्याच्या काळात प्रमुख भूमिका बजावते. हस्तांदोलन, मिठी मारणे यांपासून परावृत्त केले जाते आणि नमस्ते आणि सलाम यातून अभिवादनाच्या पद्धतींना चालना दिली जाते.
सामाजिक न्यायःकोणताही सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप यशस्वी आणि शाश्वत व्हायचा असेल तर,सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या संदर्भात तो तयार केला पाहिजे, हे महत्वाचे आहे. सामाजिक न्याय हा साध्या शब्दांत सामायिक लाभांचे योग्य वाटप आणि सामायिक बोजा वाटून घेणे याबाबत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत, मानवी कल्याणाच्या दिशेने तो रूपांतरित होतो आणि ते साध्य करण्यासाठी सर्वात वंचितांच्या गरजांची काळजी घेतली गेल्याची सुनिश्चिती केली जाते.
कोव्हिड-१९ सारख्या महामारी समाजातील वंचित घटकांमध्ये सामाजिक दुःखाला जास्त उठावदारपणे व्यक्त करतात. गरिब आणि वंचितांच्या आरोग्याबाबत कमकुवतपणा जास्त वाढवण्याशिवाय, शारिरिक अंतर राखण्यासारख्या हस्तक्षेपांमुळे लॉकडाऊन होते आणि त्याचा परिणाम आर्थिक कमकुवतपणात होतो.
रोजंदारीवर काम करणारे, अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, खासगी क्षेत्र, मुले आणि वृद्ध अशा गरिब आणि कमकुवत घटकांसाठी विशिष्ट सामाजिक सुरक्षा उपाय तयार केले जात नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्य आणि कल्याणावर घातक परिणाम होईल. लॉकडाऊनच्या संदर्भात सेवा वितरण करताना सामाजिक नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्याची वेळ आली आहे. शेवटचा वापरकर्ता लक्षात घेऊन सर्जनशील सेवा रचना तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी हे संकट संधी पुरवू शकते आणि सरकारी सेवा वितरित करण्याच्या पद्धतीत बदलही करू शकते. आरोग्य आणि कल्याण सेवा सक्रियतेने दरवाजात पोहचवण्यासाठी तंत्रज्ञानातील नवीन शोधांचा उपयोग केला जाऊ शकतो. महामारी आटोक्यात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना कंपन्याही सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून साबण आणि सॅनिटायझर्स, प्राथमिक औषधे, वैद्यकीय उपकरणे आदींचे उत्पादन वाढवून योगदान देऊ शकतात. सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांना चालना देण्यासाठी आपत्कालीन निधी उभारून ते सरकारी निधीला पूरक असा निधी देऊन योगदान देऊ शकतात.
अखेरीस आम्ही जेव्हा या संकटातून बाहेर पडू, तेव्हा पुढची योजना आखून अशा महामारींचा सामना करण्यासाठी तयार राहू, याची सुनिश्चिती करू हे महत्वाचे आहे. कारण, अशा महामारी विविध कारणांसाठी अधिक वारंवार येण्याची शक्यता दिसत आहे. लोकांचे आरोग्य आणि कल्याण मजबूत करण्यासाठी समग्र पवित्रा घेतला पाहिजे. भारतातील सार्वजनिक आरोग्य मजबूत करण्यात म्हणून सामाजिक शास्त्रज्ञ महत्वाची भूमिका बजावतात.
- नंदकिशोर कन्नुरी, पीएचडी
लेखक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, हैदराबाद येथे अतिरिक्त प्राध्यापक आहेत. या लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.