नवी दिल्ली - बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी शुक्रवारी मराठावाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी मुंडे यांनी लोकसभेत केली. यावर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत, मी महाराष्ट्राचीच असल्याचे सांगितले आहे.
लोकसभेत केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रश्नाला दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले आहे. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापूस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी संसदेत केली.
-
बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत तारांकित प्रश्न विचारत केली. pic.twitter.com/lmbGnhkvIZ
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) June 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत तारांकित प्रश्न विचारत केली. pic.twitter.com/lmbGnhkvIZ
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) June 28, 2019बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत तारांकित प्रश्न विचारत केली. pic.twitter.com/lmbGnhkvIZ
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) June 28, 2019
यावर स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर दिले. 'मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत. शक्य तेवढी मदत मराठवाड्याला केली जाईल. प्रीतम मुंडे यांनी वस्त्रोद्योग मंत्रालायाच्या संपर्कात राहावे', असे त्या म्हणाल्या. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातेही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे.