अलीगढ- अलीगढमध्ये ६ वर्षाच्या मुलीसोबत अत्याचाराची घटना समोर आली आहे. रात्री घरात झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या तरुणावर केला आहे. रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरु आहेत. मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्यावर तिच्या नातेवाईक आणि आसपासच्या लोकांनी मुलीची सुटका केली. तरुणाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अलीगढच्या पालीमुकीमपुरची ही घटना आहे.
पालीमुकीमपुर ह्द्दीतील एका गावात ६ वर्षाच्या मुलीसोबत तिच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर नातेवाईक आणि आसपासच्या लोकांनी तरुणाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलगी तिच्या वडिलांसोबत झोपली असताना, रात्री शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला उचलून नेले. तरुणाने मुलीला जवळच आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार तरुणाच्या पत्नीचे निधन झाले असून, तो घरात एकटाच राहत आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन, पुढील कारवाई करत आहेत.
ग्रामीण पोलीस अधीक्षक मणिलाल पाटीदार यांनी सांगितले की, ६ वर्षाच्या मुलीवर गावातल्याच एका व्यक्तीने अत्याचार केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करुन, मुलीला रुग्णालयात भरती करुन केले. संबंधित व्यक्तीला अटक केली असुन, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीची रवानगी तुरुंगात केली आहे.