शिमला (हि.प्र)- शहरात लॉकडाऊन असताना एका बहिणीने आपल्या संख्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला घराबाहेर हाकलल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी भाऊ आपल्या कुटुंबासह तिच्याकडे आला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे भाऊ आपल्या परिवारासह बहिणीकडेच अडकला. बहिणीने घराबाहेर हाकलल्याने परिवार निराश्रय झाले होते. मात्र, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची राहण्याची व्यव्स्था केली.
लॉकडाऊन असताना काही दिवस ठेवल्यानंतर बहिणीने तिच्या भावाला आणि तिच्या कुटुंबाला टोमणे मारण्यास सुरुवात केली. कुटुंबातील ९ लोकांमध्ये २ लहान मुलांचा देखील समावेश आहे. बहिणीने या कुटुंबाला जेवायला न देताच त्याना उपाशी पोटी काल घराबाहेर काढले. कुटुंबाला कुठेच आश्रय मिळत नसल्याने त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी नीरज चांदला यांच्याशी संपर्क केला. नंतर चांदला यांनी कालीबाडी मंदिरात कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली.
आम्हाला लग्नात आमंत्रित करण्यात आले होते आणि २४ तारखीला आम्ही परत आपल्या गावी जाणार होतो. मात्र, मधातच लॉकडाऊन झाल्याने आम्ही शहरातच अडकलो आणि कालीबाडी मंदिरामध्ये थांबलो. मात्र, बहीण आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. त्यानंतर तिने आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली. आम्ही नंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना मदत मागितली, असे कुटुंबाने सांगितले. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी नीरज चांदला यांनी कुटुंबाची तपासणी करवून घेतल्यानंतर त्यांना कालीबाडी मंदिरात राहण्यासाठी पाठवले आहे. या पुढे असा प्रकार घडल्यास सक्त कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी नीरज चांदला यांनी दिली.
हेही वाचा- आओ दीया जलाएं! पंतप्रधान मोदींनी शेअर केली वाजपेयींची कविता