भुवनेश्वर - ओडिशात १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ४९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती बचाव-मदत आयुक्त पी. आर. मोहापात्रा यांनी दिली.
'२०१७-२८ या वर्षात ४६४ जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर मागील वर्षी हे प्रमाण घटून ३१८ वर आले होते. आम्ही लोकांना वीजांपासून सावध राहण्याच्या सूचना देत आहोत,' असे मोहापात्रा यांनी सांगितले आहे.