बंगळूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहे. यामुळे कर्नाटक कॉंग्रेसचे प्रमुख डी. केे. शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. हा राजकीय कट असल्याचा आरोप शिवकुमार यांनी सोमवारी केला.
येत्या 7 जूनला त्यांचा शपथविधी सोहळा होणार होता. या कार्यक्रमाला 150 लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी, मुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि शहर पोलीस आयुक्त यांना विनंती केली होती. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार राजकीय कार्यक्रमांना बंदी असल्याचे सांगण्यात आले, असे शिवकुमार यांनी सांगितले. हा राजकीय कट आहे, असा आरोप त्यांनी केला.
यामुळे हा 7 जूनला होणारा शपथविधी सोहळा आता होणार नाही. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा अजूनही आदर करतो. यामुळे आम्ही नियमांचे पालन करू, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
'शपथविधीला परवानगी न मिळणे हा राजकीय कट' - कर्नाटक कॉंग्रेस प्रमुख डी. केे. शिवकुमार
येत्या 7 जूनला कर्नाटक कॉंग्रेसचे प्रमुख डी. केे. शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होणार होता. या कार्यक्रमाला 150 लोक सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम 7 जूनला आयोजित करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी, आम्ही मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, आणि शहर पोलीस आयुक्त यांना विनंती केली होती.