नवी दिल्ली - भाजपने दिल्लीतील ४ जागांवर उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेसनेही शेवटी आपले पत्ते खोलले आहेत. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीवर सर्वांच्या नजरा लागून होत्या. मात्र, काँग्रेसने ६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम लागले आहे. विशेष म्हणजे ईशान्य दिल्लीच्या जागेवर चुरशीची लढत होणार आहे.
भाजपने रविवारी राजधानी दिल्लीतील ७ जागांपैकी चार जागांवर उमेदवार घोषित केले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष ईशान्य दिल्लीच्या जागेवर लागलेले आहे. कारण येथून भाजपने प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना उमेदवरी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर या जागेवरील लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये तिवारी समोर मोठे आव्हान उभे केले आहे.
-
दिल्ली से कांग्रेस के सभी उम्मीदवारों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं💐. @SheilaDikshit @inc_jpagarwal @ajaymaken @ArvinderLovely @RajeshLilothia #JitengeDelhiJitengeDesh #जीतेंगे_दिल्ली_जीतेंगे_देश #LokSabhaElections2019 @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @INCDelhi pic.twitter.com/wZNwjZsxmo
— Ghanendra Bhardwaj (@GhanendraB) April 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">दिल्ली से कांग्रेस के सभी उम्मीदवारों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं💐. @SheilaDikshit @inc_jpagarwal @ajaymaken @ArvinderLovely @RajeshLilothia #JitengeDelhiJitengeDesh #जीतेंगे_दिल्ली_जीतेंगे_देश #LokSabhaElections2019 @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @INCDelhi pic.twitter.com/wZNwjZsxmo
— Ghanendra Bhardwaj (@GhanendraB) April 22, 2019दिल्ली से कांग्रेस के सभी उम्मीदवारों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं💐. @SheilaDikshit @inc_jpagarwal @ajaymaken @ArvinderLovely @RajeshLilothia #JitengeDelhiJitengeDesh #जीतेंगे_दिल्ली_जीतेंगे_देश #LokSabhaElections2019 @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @INCDelhi pic.twitter.com/wZNwjZsxmo
— Ghanendra Bhardwaj (@GhanendraB) April 22, 2019
काँग्रेसने ईशान्य दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या आघाडीचे नेते एकमेकांविरोधात उभे झाले आहेत. त्यामुळे देशाचे लक्ष आता दिल्लीच्या ईशान्य लोकसभा मतदार संघावर लागून राहणार आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेच्या ७ जागांसाठी १२ मे ला सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. येथील जनता मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश येथून कामाच्या शोधात दिल्लीमध्ये स्थायीक झाली आहेत. भाजपचा याच मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, शीला दीक्षित यांनीही दिल्लीची गादी अनुभवली आहे. त्यामुळे ही लढत मनोज तिवारींसाठी कठिण होण्याची शक्यता तयार झाली आहे.