ETV Bharat / bharat

बिहार निवडणुकीच्या रिंगणात शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाची 'एन्ट्री' - लव सिन्हा लढणार निवडणूक

बिहार विधानसभा निवडणुकीतून बॉलिवूड अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा राजकीय पदार्पण करणार आहेत. लव सिन्हा यांना काँग्रेसने पाटणा जिल्ह्याच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

लव सिन्हा
लव सिन्हा
author img

By

Published : Oct 15, 2020, 7:08 PM IST

पाटणा - बिहार निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूड अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हादेखील उतरला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतून लव सिन्हा राजकीय पदार्पण करणार आहेत. लव सिन्हा यांना काँग्रेसने पाटणा जिल्ह्याच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

लव सिन्हा यांची आतापर्यंत कोणतीही राजकीय ओळख नाही. त्यांचा सामना भाजपचे सद्य आमदार नितीन नवीन यांच्याशी होणार आहे. बाकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून नितीन नवीन गेल्या तीन वेळेस निवडूण आले आहेत. तसेच जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी ही बांकीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यांनी प्लूरल्स पक्षांची स्थापना केली आहे.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच सिन्हा हे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचेही जवळचे मानले जातात. काँग्रेसने राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांसोबत महाआघाडी केली आहे.

243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. तर 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.