ETV Bharat / bharat

कोरोना विषाणूच्या प्रसारसाठी एका समुदायाला दोष देणे योग्य नाही - शरद पवार - कोरोना

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन बाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे पार पडली. सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तबलिगी जमात आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले.

sharad pawar said targeting one society on corona spread
कोरोना विषाणच्या प्रसारसाठी एका समुदायाला दोष देणे योग्य नाही- शरद पवार
author img

By

Published : Apr 9, 2020, 9:25 AM IST

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूच्या प्रसारसाठी एका समुदायाला दोष देणे योग्य नाही, असे सांगितले. आपले सर्व लक्ष कोरोनाचा प्रसार थांबवण्याकडे असावे, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनचे 21 दिवस पूर्ण झाल्यानतंतर काही क्षेत्रांमधील निर्बंध काढले पाहिजेत, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्याद्वारे कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येला धार्मिक रंग देऊन दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने राज्यांचा वस्तू आणि सेवा कराचा परतावा देण्याची मागणी शरद पवार यांनी केली. उद्योग आणि शेती क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाले असून पंतप्रधानांनी या क्षेत्रांना मदत करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

कोरोनासोबतची लढाई बरेच दिवस चालणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फटका बसणार असून अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी काय उपाय करावेत, यावरही विचार करावा, असे पवार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.