बुलंदशहर (उत्तरप्रदेश) - 16 वर्षाच्या मुलीवर 72 वर्षाच्या नराधमासह अनेकांनी अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडिता चार महिन्याची गर्भवती आहे, हे समजल्यावर ही घटना समोर आली, अशी माहिती काकोड पोलिसांनी शनिवारी दिली.
पीडितेने दिलेल्या माहिनुसार, तिच्यावर 72 वर्षाच्या व्यक्तीसह अनेकांनी लैंगिक अत्याचार केले. मागील दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. तर या प्रकरणाची बाहेर वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अशी माहिती तपासात समोर आले आहे.
यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.