जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात व्हॅन आणि ट्रेलर समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्हॅन कोटाहून भिलवाडाकडे जात होती. यावेळी अपघात झाल्यानंतर व्हॅनमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. उन्मेष (४०), मुकेश (२३), जम्ना (४५), अमरचंद (३२), राजू (२१), राधेश्याम (५६) आणि शिवलाल (४०) अशी मृतांची नावे आहेत. अपघातामध्ये यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णालयामध्ये उपचारांदरम्यान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ते नातेवाईकांना सुपूर्द केले जातील.
हेही वाचा : १२ सप्टेंबरपासून धावणार दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सात अतिरिक्त गाड्या..