ETV Bharat / bharat

क्लिनिकल ट्रायलसाठी सिरम इन्स्टिट्युटने DCGI कडे मागितली परवानगी

ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी या कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जाहीर केले आहे. जगभरात विकसित करण्यात येत असलेल्या लसींमध्ये ही लस आघाडीवर आहे. प्रसिद्ध लॅन्सेट सायन्स संस्थेनेही लसीच्या सकारात्मक परिणामांना दुजोरा दिला आहे.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : Jul 25, 2020, 8:17 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही कंपनी ‘अस्ट्राझेनका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर मिळून कोरोनावर लस विकसित करत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यासाठी कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकांकडे(DCGI) परवानगी मागितल्याचे सुत्रांनी सांगितले. या लसीचे परिणाम सकारात्मक येत असून लवकच पुढच्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यात येणार आहे.

'कोविडशिल्ड' या लसीची चाचणी घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्युटने शुक्रवारी औषध महानियंत्रकांकडे अर्ज दाखल केल्याचे सुत्रांनी सांगितले. अर्जानुसार कंपनी लसीची प्रतिकारक्षमता आणि सुरक्षितता पाहण्यासाठी ऑब्जर्व्हर ब्लाईंड, रँडमाईज्ड कंट्रोल स्टडी ही चाचणी स्वस्थ व्यक्तींवर करणार आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सुमारे सोळाशे स्वयंसेवक या अभ्यासात सहभागी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील लसीच्या प्राथमिक अभ्यासातून सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. इंग्लडमधील पाच ठिकाणी लसीची ट्रायल घेण्यात आली होती. या चाचणीत व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढली असून लस सुरक्षित असल्याचेही दिसून आल्याचे सुत्रांनी सांगितले.

कोरोना लसीचे 100 कोटी डोस तयार करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट कंपनीने अस्ट्राझेनका कंपनीबरोबर उत्पादन करार केल्याचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी सांगितले. ही लस भारत आणि मध्यम आणि कमी उत्पन्न गट असलेल्या देशांसाठी असेल. ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे, असे ते म्हणाले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी(20 जुलै) कोविडशिल्ड या कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जाहीर केले आहे. जगभरात विकसित करण्यात येत असलेल्या लसींमध्ये ही लस आघाडीवर आहे. प्रसिद्ध लॅन्सेट सायन्स संस्थेनेही लसीच्या सकारात्मक परिणामांना दुजोरा दिला आहे. व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता तयार होत असून ती सुरक्षित असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे. संपूर्ण जगाच्या या लसीकडून आशा लागल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.