'कोविशिल्ड' लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळपर्यंत सर्व कंटेनर कंपनीमधून निघून देशभरात पोहोचत आहेत. सीरमच्या पुण्यातील मुख्यालयातून शेवटचा कंटेनर बाहेर पडाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. आपल्या आठ-नऊ महिन्याच्या अथक परिश्रमांचे हे फळ असल्याचे समाधान सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सीरमची कोविशिल्ड देशभरात रवाना; कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद - covishild vaccine transportation
19:09 January 12
देशभरात कोविशिल्ड रवाना; सीरम कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद..
17:15 January 12
आंध्रमध्ये पोहोचली कोविशिल्ड..
पुण्याहून निघालेला कोविड लसीचा कंटेनर आंध्र प्रदेशमध्ये पोहोचला आहे. राज्याच्या विजयवाडामध्ये या लसीचे डोस पोहोचले आहेत.
17:12 January 12
पश्चिम बंगालमध्ये पोहोचली लस..
दुपारी तीनच्या सुमारास कोविशिल्ड लसीचा कंटेनर पुण्याहून कोलकाता विमानतळावर पोहोचला. त्यानंतर या कंटेनरला कोलकात्याच्या सेंट्रल फॅमिली मेडिकल स्टोअर्समध्ये आणण्यात आले. याठिकाणी हे डोस साठवून ठेवले जाणार आहेत.
12:32 January 12
आत्तापर्यंत तीन कंटेनरद्वारे लस विमानतळाकडे नेण्यात आली
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून सहा कंटेनद्वारे 'कोविशील्ड' लस पुरवठा करण्यात येईल, असे बोलले जात होते. मात्र, पहाटे तीन कंटेनर पुणे विमानतळावर गेले. त्यानंतर आणखी तीन कंटेरन कधी निघणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त तीनच कंटेनरद्वारे लस पुरवठा करण्यात आला. इतर तीन कंटेनरबद्दल माहिती मिळाली आहे. दुपारनंतर याबाबत माहिती स्पष्ट होईल अशी माहिती मिळत आहे.
12:15 January 12
फक्त तीनच कंटेनरद्वारे लस पुरवठा

11:50 January 12
कार्गो विमानाने कोरोना लस दिल्लीत दाखल
सीरम कंपनीची कोविशिल्ड लस स्पाईसजेट कंपनीच्या कार्गो फ्लाईटने दिल्लीत दाखल झाली आहे. तापमान नियंत्रित बॉक्समध्ये लसीची वाहतूक करण्यात येत आहे.
11:24 January 12
कोरोना लस गुजरातमध्ये पोहचली
गुजरात राज्यात कोविशिल्ड लस विमानाने पोहचली आहे. पुण्याहून अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने लसीचे बॉक्स आणण्यात आले. गुजरातचे उप मुख्यमंत्री नितीन पटेल यावेळी विमानळावर उपस्थित होते.
09:56 January 12
९ फ्लाईटद्वारे देशातील विविध भागात लस पोहचणार
पुण्यातून सीरमची कोविशिल्ड लस देशातील विविध राज्यांत पोहचवण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. " आज पुण्यातून सुमारे ५६ लाख लसीचे डोस एअर इंडिया, स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सच्या ९ फ्लाईटद्वारे देशातील विविध भागात पोहचवण्यात येतील. यामध्ये दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भूवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनौ, चंदीगड या शहरांचा समावेश आहे" अशी माहिती नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली.
09:37 January 12
विमानतळावर कंटेनरमधील लसीचे बॉक्स खाली करताना कर्मचारी
09:29 January 12
कोरोना लसीचे आणखी तीन कंटेनर १० वाजता निघणार
सीरम कंपनीतून कोविशिल्ड लसीचे तीन कंटेनर पहाटे पुणे विमानतळावर दाखल झाले. तेथून देशातील विविध राज्यात लस पोहचवण्यात येणार आहे. आता सकाळी दहा वाजता आणखी तीन कंटेनर विमानतळाकडे जाणार आहेत. ईटीव्ही भारतने सीरम कंपनीबाहेरून लस वाहतुकीचा आढावा घेतला आहे.
09:20 January 12
एअर इंडियाच्या विमानातून कोरोना लस अहमदाबादला रवाना होणार
09:18 January 12
स्पाईस जेटमधून लस दिल्लीला रवाना
स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने कोविशिल्ड लसीचे बॉक्स दिल्लीला पाठविण्यात येत आहेत. लस वाहतूकीचीही ही स्पाईस जेटची पहिलीच फेरी आहे. एकूण ३४ बॉक्स असून त्यांचे वजन सुमारे १ हजार किलो आहे, स्पाईस जेट कंपनीचे चेअरमन आणि संचालक अजय सिंह यांनी ही माहिती दिली.
09:13 January 12
कोरोना लस सर्वात आधी अहमदाबादला पोहचणार
पुण्यातील लोहगाव विमानतळावर कोरोना लसीचे बॉक्स पोहचले असून देशातील विविध राज्यात लस विमानाने पोहचवण्यात येणार आहे. सर्वात पहिल्यांदा लस गुजरातमधील अहमदाबादला एअर इंडियाच्या विमानाने पोहच होणार आहे, अशी माहिती विमानतळ अधिकारी प्रसन्न मिस्त्री यांनी दिली.
08:29 January 12
पाहा कोविशिल्ड लसीचे पॅकेजिंग
08:28 January 12
कोरोना लस लहान बॉक्समध्ये पॅक करून विमानाने विविध राज्यात पाठविण्यात येत आहे
08:08 January 12
दिवसभरात सहा कंटेनरमधून लसची वाहतूक
कोल्ड स्टोरेजची सुविधा असलेल्या शीतगृहातून सहा कंटेनरमधून लस पुणे विमानतळावर जाणार आहे. यातील तीन कंटेनर विमानतळावर दाखल झाले असून अद्याप तीन कंटेनर बाकी आहेत. लस सीरम कंपनीमध्ये तयार करून ठेवण्यात आली होती. तेथून आता भारतातील विविध शहरात लसीचे वितरण सुरू झाले आहे. १६ तारखेपासून प्राधान्य क्रमाने लसीकरण सुरू होणार आहे.
07:58 January 12
१३ शहरांत विमानाने दाखल होणार लस
कोविशील्ड लशीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.
07:57 January 12
सीरम कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त
लस वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सीरम कंपनीबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
07:51 January 12
तीन कंटेनर आज पहाटे रवाना
सीरम कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे वितरण सुरू झाले आहे. लसीचे डोस कंटेनरमध्ये भरून पुणे विमातळावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ३ कंटेनर विमानतळावर दाखल झाले आहेत.
07:40 January 12
सीरम कोविशिल्ड लसीचे वितरण सुरू
पुणे - जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीला संपवण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. 'कोवीशिल्ड' लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे देशातील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतिक्षा संपली आहे. १६ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे.
सीरमच्या लशीचे तीन कोल्डस्टोरेज कंटेनर प्रथम पाठवण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले पहिले तीन कंटेनर आज पहाटे रवाना झाले आहेत. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे डोस भरल्यानंतर त्याची आतमध्ये नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर पोलिसांचादेखील मोठा बंदोबस्त तैनात होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील या पहाटेपासून स्वतः येथे हजर होत्या. कंटेनर ठीक चार वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडला. यावेळी तीन कंटेनर पाठवण्यात आले. तर आता दिवसभरात एकूण 6 कंटेनर हे डोस घेऊन जाणार आहेत.