नवी दिल्ली - पडपडगंज मॅक्स रुग्णालयावर मौजपूर येथील एका तरुणीने गंभीर आरोप केला आहे. आईचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने उपचाराच्या नावाखाली माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आणि पैसै दिले नाही. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले, असे तरुणीने म्हटलं आहे.
मौजपूर येथील रहिवासी शीलच्या मते, तिची आई ललिता गंभीर आजारांने ग्रस्त होत्या. गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शीलाने ललिता यांना पडपडगंज मॅक्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ललिता यांची प्रकृती गंभीर असून सीपीआर देण्यासाठी 50,000 हजार रुपये भरण्यास सांगितले. जेव्हा शीलाने आईची प्रकृती पाहिल्याशिवाय पैसे जमा करण्यास नकार दिला. तेव्हा ललीता यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आईचा मृतदेह मागितल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने शीलाला 8 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवल्याचे कारण देत, पैसे जमा केल्यानंतरही मृतदेह देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. अखेर उच्च अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपानंतर शवविच्छेदनाविना मृतदेह देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.