ETV Bharat / bharat

काश्मीर खोऱ्यात आंदोलनांसाठी पाकमधून मिळत होता पैसा; फुटीरतावादी नेत्याची कबुली

'आसिया अंद्राबी परदेशातील काही संघटनाकडून पैसे घेत होती. या पैशांच्या बदल्यात ती ‘दुखतारन-ए-मिल्लत’ या आपल्या संघटनेमार्फत काश्मीर खोऱ्यात महिलांची आंदोलने घडवून आणत होती,' असे एनआयएच्या चौकशीदरम्यान अंद्राबी हिने मान्य केले आहे.

एनआयए
author img

By

Published : Jun 16, 2019, 10:07 PM IST

नवी दिल्ली - मुस्लीम लीगचा नेता मसरत आलम याने पाकिस्तानी एजंटांकडून हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये पैसे पाठवले होते. मसरत आलम हा काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांचा आणि आंदोलकांचा तथाकथित पोस्टर बॉय मानला जात होता. अशाच प्रकारे फुटीरतावादी नेता सयेद शाह गिलानी यालाही पैसा पुरवला जात होता, असे राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) म्हटले आहे.

हवालाच्या माध्यमातून येणारा हा पैसा ताब्यात घेणे आणि त्याचा वापर करणे यावरून हुर्रीयत कॉन्फरन्ससोबत वाद निर्माण झाला होता, अशी धक्कादायक कबुलीही मसरत आलम याने दिली आहे. एनआयएने या प्रकरणात १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात हफीज मोहम्मद सयीद (जमात-उल-दवाचा म्होरक्या), सयेद सलाहुद्दीन (बंदी घालण्यात आलेल्या हिज्ब-उल-मुजाहिदीनचा म्होरक्या), ७ फुटीरतावादी नेते, २ हवाला एजंटस आणि काही दगडफएक करणाऱ्यांचा समावेश आहे.

बंदी घालण्यात आलेल्या संघटना जेकेएलएफचा नेता यासीन मलिक, दुखतारन-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी, सुटीरतावादी नेता शबीर शाह आणि मुस्लीम लीगचा मसरत आलम यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. चारही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

'काश्मीर खोऱ्यात सरकार आणि सैन्याविरोधात महिलांची आंदोलने घडवून आणण्यासाठी आपल्याला परदेशातून पैसा मिळत होता,' अशी कबुली जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी महिला नेता आसिया अंद्राबी हीने रविवारी राष्ट्रीय तपास पथकासमोर (एनआयए) दिली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

'आसिया अंद्राबी परदेशातील काही संघटनाकडून पैसे घेत होती. या पैशांच्या बदल्यात ती ‘दुखतारन-ए-मिल्लत’ या आपल्या संघटनेमार्फत काश्मीर खोऱ्यात महिलांची आंदोलने घडवून आणत होती,' असे एनआयएच्या चौकशीदरम्यान अंद्राबी हिने मान्य केले आहे.

'२०११ नंतर मलेशियात अंद्राबीच्या मुलाला शैक्षणिक खर्चासाठी परदेशातील जहूर वाटाली (अहमद शाह) या हवाला एजंटच्या माध्यमातून पैसा मिळत होता. ही बाब तिच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वाटाली हा हवालाच्या प्रमुख एजंटांपैकी एक असून त्याला पाकिस्तानकडून पैसा मिळतो,' असे एनआयएने म्हटले आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.