नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी १२. वाजून ०७ मिनिटांनी निधन झाल्याचे एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटलींनी आज वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दर्शविला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी चिठ्ठीच लिहिली होती. गेल्या १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. त्यामुळे मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असे जेटली यांनी या पत्रात नमूद केले होते.
-
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019
जेटली 2000पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
-
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS. pic.twitter.com/pmr4xiyqYV
— ANI (@ANI) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS. pic.twitter.com/pmr4xiyqYV
— ANI (@ANI) August 24, 2019Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS. pic.twitter.com/pmr4xiyqYV
— ANI (@ANI) August 24, 2019
२८ डिसेंबर १९५२ ला अरुण जेटली यांचा जन्म झाला होता. १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. आणि १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.
जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती.
त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते. जेटली हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. २००० सालापासून ते राज्यसभेचे सदस्य होते. जून ३, २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली होती.