ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत 'लष्कर'च्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान जखमी - encounter

भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक
author img

By

Published : Apr 1, 2019, 8:04 AM IST

Updated : Apr 1, 2019, 10:17 AM IST

पुलवामा ( जम्मू काश्मीर ) - जिल्ह्यातील लस्सीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. हे चारही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून चकमकीत सुरक्षा दलाच्या ३ जवानांसह एक पोलीस जखमी झाला आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक

पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने सोमवारी पहाटेपासून परिसरात शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. तेव्हा सुरक्षा दलांनी या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे. चकमकीत जखमी झालेल्या जवान आणि पोलीस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी संघटनाच्या विरोधात कडक पाऊल उचलले आहे. सुरक्षा दलाने मागील ३ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून ६० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

Intro:Body:

security forces Lashkar-e-Taiba 4 terrorists  killed in encounter Pulwama District

security force,Lashkar-e-Taiba,terrorist,encounter, Pulwama

जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत 'लष्कर'च्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान जखमी

पुलवामा ( जम्मू काश्मीर ) - जिल्ह्यातील लासिपोरा भागात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले असून अद्याप चकमक सुरू आहे.  

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी संघटनाच्या विरोधात कडक पाऊल उचलले आहे. सुरक्षा दलाने मागील ३ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून ६० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 1, 2019, 10:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.