ETV Bharat / bharat

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा - August 15

या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी, एसपीजी, आयटीबीटी यांनाही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून धोकादायक माहिती संदर्भात काम करतील, तसेच स्वॅट (SWAT) पथक आणि पराक्रम व्हॅन सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा

author img

By

Published : Aug 14, 2020, 8:21 AM IST

नवी दिल्ली - उद्या(शनिवारी) 15 ऑगस्टला होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे, तर देशाच्या सर्व सीमावर्ती भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी, एसपीजी, आयटीबीटी यांनाही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून धोकादायक माहिती संदर्भात काम करतील, तसेच स्वॅट (SWAT) पथक आणि पराक्रम व्हॅन सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत काही साध्या वेशातील सुरक्षा रक्षकही संपूर्ण शहरात तैनात करण्यात येतील. यामध्ये लालकिल्ला परिसरात जास्त लक्ष्य केंद्रित केले जाईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने लाल किल्ला परिसरात स्कॅन मशीन ही बसवण्यात आल्या आहेत. फेसिअल रिगनिशन सिस्टम ज्याच्या मदतीमुळे संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवता येईल. जवळपास 45 हजार सुरक्षा रक्षक दिल्लीमध्ये तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये तब्बल 2 हजार स्नायपर लाल किल्ल्याच्या 5 किमी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. लाल किल्ल्यावर करण्यात आलेल्या सुरक्षेसह राष्ट्रपती भवन परिसरातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्लीच्या सुरक्षेसाठी तैनात व्यवस्थेमध्ये 20 श्वानपथकांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पथकांना अलर्ट करण्यात आले आहे. बॉम्ब शोध व नाशक पथकही अलर्ट असून त्यांनाही रणनिती च्या दृष्टीने लालकिल्ला परिसरात तैनात करण्यात आले आहे.

दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 350 पोलिसांना यापूर्वी दिल्लीच्या पोलीस कॉलनीमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा लक्षणे आढळून येत आहेत अशांनी या कार्यक्रमाला येण्याचे टाळावे असे दिल्ली पोलिसांनी सूचित केले आहे.

गाझियाबाद पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रेल्वे स्टेशन, बस स्टँड यामध्ये विशेष शोध मोहीम राबविण्यात आली असल्याचे ही पोलीस सूत्रांकडून समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.