नवी दिल्ली- झारखंडचे राज्यसभा सभासद डी.पी साहू यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाने आज सहमती दर्शविली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने प्रदीप सॉन्थालिया यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. चार आठवड्यानंतर सॉन्थालिया यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले आहे.
याचिकाकर्ते प्रदीप सॉन्थालिया हे भाजप तर्फे 2018 या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार होते. त्यांचा मते डी.पी साहू यांनी बेकायदेशीरपणे राज्यसभेची जागा बळकावली. तेव्हापासून प्रदीप हे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या सादर करावयास लावावी, या साठी प्रयत्न करत होते.
2018 या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत डी.पी साहू यांनी सॉन्थालियाचा पराभव केला होता. या वेळी सोंथालिया हे 0.33 मतांनी पराभूत झाले होते. मात्र, जेएमएमचे एक आमदार अमित महतो यांना मतदानाच्या दिवशी जुन्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. त्यामुळे सॉन्थालिया हे महतो यांच्या मताच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.