ETV Bharat / bharat

विजय मल्ल्याने दाखल केलेल्या फेरयाचिकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जात मल्ल्याने आपल्या मुलांना पैसे हस्तांतर केले होते. पैसे हस्तांतर करण्यास न्यायालयाची मनाई होती. त्यामुळे न्यायालयाचा अपमान केल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात मल्याने फेर याचिका दाखल केली होती. मागील 3 वर्षांपासून मल्ल्याने दाखल केलेली याचिका संबंधित न्यायालयापुढे सुनावणीला का घेण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने आपल्या रजिस्ट्री कार्यालयाकडे मागितले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 6, 2020, 1:02 PM IST

नवी दिल्ली - मद्य सम्राट विजय मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरयाचिकेला न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे. न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला दोषी धरण्यात आले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत याचिका न्यायालयात दाखल होती.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जात मल्ल्याने आपल्या मुलांना पैसे हस्तांतर केले होते. पैसे हस्तांतर करण्यास न्यायालयाची मनाई होती. त्यामुळे न्यायालयाचा अपमान केल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात मल्याने फेर याचिका दाखल केली होती. मागील 3 वर्षांपासून मल्ल्याने दाखल केलेली याचिका संबंधित न्यायालयापुढे सुनावणीला का घेण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने आपल्या रजिस्ट्री कार्यालयाकडे मागितले आहे.

न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि अशोक भूषण यांनी 16 जूनला मल्ल्याने दाखल केलेली फेरयाचिक सुनावणीला घेतली होती. संबंधित फाईल हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने रजिस्ट्रीला दिले आहेत.

आमच्याकडे आलेल्या रेकॉर्डनुसार मागील 3 वर्षांपासून ही फेरविचार याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली नाही. 16 जूनला न्यायालयाने दिलेला निर्णय वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. याचिका सुनावणीला दिरंगाई झाल्याप्रकरणी न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्स आणि विविध उद्योगांद्वारे घेतलेले 9 हजार कोटी कर्ज बुडविले आहे. भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर मल्ल्या लंडनला पळून गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.