ETV Bharat / bharat

'लव्ह जिहाद कायद्याचा विधानसभेत विरोध करू'

author img

By

Published : Nov 29, 2020, 3:51 PM IST

जबरदस्तीने धर्मांतर करण्यास निर्बंध घालणाऱ्या अध्यादेशावर नुकतीच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर सपाने ही भूमिका मांडली आहे.

samajwadi-party-
samajwadi-party-

लखनऊ - उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा केल्यानंतर आता यास विरोध करणार असल्याचे समाजवादी पार्टीने म्हटले आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्यास निर्बंध घालणाऱ्या अध्यादेशावर नुकतीच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर सपाने ही भूमिका मांडली आहे.

'त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणारा कायदा आणा'

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या कायद्याचा तीव्र विरोध केला असून अशाप्रकारच्या सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणार नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना ५० हजार द्यायचे आणि दुसरीकडे अशाप्रकारचे कायदे करायचे. त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणारा कायदा आणावा, याबद्दल आम्ही आग्रही असू, असे ते म्हणाले.

'भ्रष्टाचार उघडकीस आणू'

शासकीय शॉपिंग मॉल ज्याची किंमत १ हजार कोटींच्या आसपास आहे ती एका खासगी व्यक्तीला हे भाजपा सरकार देत आहे. अशाप्रकारे होणारा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू. भ्रष्टाचाराचा विरोध करत असल्याचे सरकार सांगते. मात्र आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात देश लाचखोरीच्या, भष्टाचाराच्या घटनांमध्ये अव्वल स्थानावर आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.

'त्यांना सौर ऊर्जेमधील काहीही माहिती नाही'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १०, ००० मेगावॅट सौरऊर्जा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचाही अखिलेष यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "त्यांना सौर ऊर्जेबाबत काहीही माहिती नाही. सपा सरकारच्या काळात आम्ही सौर ऊर्जा युनिटची स्थापना केली होती. पुरेसे वीज उत्पादन केले. मात्र आता ग्रामस्थांनी बिले दिली नाहीत, म्हणून सरकारने वीजपुरवठा खंडित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.