नवी दिल्ली - देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शरजील इमामला आज(बुधवारी) दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता दिल्ली गुन्हे शाखेने त्यांचा ताब्यात घेतले आहे.
देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर दिल्लीसह उत्तर प्रदेश, आसाम, मनिपूर आणि बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याच्या मागावर होते मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. मंगळावारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला बिहारमधील जहानाबाद येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज त्याला दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते.
कोणते देशविरोधी वक्तव्य केले होते
मागील डिसेंबर महिन्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रदर्शनात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पुर्वकडील राज्यांना जोडणारा भाग म्हणजे चिकन्स नेक( चिंचोळा भूप्रदेश) तेथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.