नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाकडून नवीन अध्यक्षपदाची शोध मोहीम सुरु आहे. यातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदासाठी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांची नावे सुचवली आहेत.
-
M Deora, Mumbai Congress President: I agree with Punjab CM that new Congress Pres should be young, capable&possess electoral, administrative&org experience with a pan India appeal. In my view, Sachin Pilot & Jyotiraditya Scindia have these qualities & can provide strength to org. pic.twitter.com/ZPlFvAGQ3B
— ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">M Deora, Mumbai Congress President: I agree with Punjab CM that new Congress Pres should be young, capable&possess electoral, administrative&org experience with a pan India appeal. In my view, Sachin Pilot & Jyotiraditya Scindia have these qualities & can provide strength to org. pic.twitter.com/ZPlFvAGQ3B
— ANI (@ANI) August 4, 2019M Deora, Mumbai Congress President: I agree with Punjab CM that new Congress Pres should be young, capable&possess electoral, administrative&org experience with a pan India appeal. In my view, Sachin Pilot & Jyotiraditya Scindia have these qualities & can provide strength to org. pic.twitter.com/ZPlFvAGQ3B
— ANI (@ANI) August 4, 2019
पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या अध्यक्ष हा उर्जावान असावा या मताशी मी सहमत आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण आणि सक्षम असावा. त्याला निवडणुकीचं राजकारण, प्रशासन आणि पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव असावा. हे सर्व गुण सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांकडे असून ते काँग्रेसच्या संघटनेला बळ देऊ शकतात, असे मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.
जर प्रियांका गांधी यांनी पुढाकार घेऊन पक्षाचे नेतृत्व सांभाळले, तर आनंदच होईल. मात्र, गांधी परिवाराने स्पष्ट केले आहे की, काँग्रेसचा आगामी अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसेल, त्यामुळे ही शक्यता निर्माण होत नाही, असे देवरा यांनी म्हटले आहे.
यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करा, अशी मागणी करणारे पोस्टर्स मध्यप्रदेशात लागले होते.
येत्या 10 तारखेला काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी पक्षाने अध्यक्षपदासाठी एखाद्या नेत्याची औपचारीक घोषणा केली नाही.