ETV Bharat / bharat

'आम्ही राष्ट्रहिताचे असेल, तेच करू,' परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सुनावले

'काऊंटरिंग अमेरिकाज अॅडव्हरसरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट' (CAATSA) अंतर्गत विविध देशांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. यावर बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी 'भारताचे अनेक देशांशी संबंध आहेत. या संबंधांना इतिहास आहे. आम्ही आमच्या देशाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, त्या करू,' असे जयशंकर यांनी म्हटले.

अमेरिका- भारत
author img

By

Published : Jun 27, 2019, 12:06 AM IST

नवी दिल्ली - 'भारत अमेरिकेने प्रतिबंध लादलेल्या रशियासह सर्व देशांशी राष्ट्रहितासाठी आवश्यक संबंध ठेवणार आहे,' असे भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे. भारत रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष माईक पॉम्पियो यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ही बाब स्पष्ट केली.

सध्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. ­­यावेळी पॉम्पियो यांनी ट्रेड वॉर आणि एस-४०० वरही भाष्य केले.

'भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण भागीदार-मित्रदेश आहे. या संबंधांना नवीन आयाम प्राप्त होत आहेत. आम्हाला जोडीदार मिळाले नाहीत आणि आम्ही एकत्र काम केले नाही असे, कधीही झाले नाही. देशांना स्वत:ची सुरक्षा करता यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतानेही असेच प्रयत्न करावेत, अशी आमची अपेक्षा आहे, असे मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. तसेच या दोन्ही मुद्द्यांना संधीच्या रूपात आम्ही पाहतो. तसेच आम्ही एकत्र काम करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करू शकतो,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जयशंकर यांनी ट्रम्प प्रशासनाने दहशतवादाविरोधात केलेल्या मजबूत सहकार्यबद्दल आभार मानले.

'काऊंटरिंग अमेरिकाज अॅडव्हरसरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट' (CAATSA) अंतर्गत विविध देशांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. यावर बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी 'भारताचे अनेक देशांशी संबंध आहेत. या संबंधांना इतिहास आहे. आम्ही आमच्या देशाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, त्या करू. या रणनैतिक भागीदारीचा हिस्सा असलेला प्रत्येक देश एकमेकांची क्षमता आणि राष्ट्रीय हिताचा सन्मान करतो,' असे जयशंकर यांनी म्हटले.

  • External Affairs Minister S Jaishankar on Countering America's Adversaries Through Sanctions Act (CAATSA) issue: We have many relationships with many countries, many of them are of some standing. They have a history. We will do what is in our national interest. pic.twitter.com/PMJvhlGg6K

    — ANI (@ANI) June 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, अमेरिका आणि इराण विषयावर बोलताना आखाती देशांमधील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले. आम्ही यावेळी प्रादेशिक सुरक्षा, व्यापाराबाबतही चर्चा केली. इराणबाबत भारताचा एक वेगळा दृष्टीकोन असून पॉम्पियो यांनी इराणबाबत असलेल्या चिंता व्यक्त केल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, इराण दहशतवादाला पोसणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारताला मोठ्या प्रमाणात दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचेही पॉम्पियो म्हणाले. अमेरिका आणि भारताची भागीदारी एका नव्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. तसेच आम्ही दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यालाही अधिक दृढ केले आहे. याव्यतिरिक्त आम्ही ऊर्जा, अंतराळ आणि अन्य क्षेत्रांमध्येही परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी पॉम्पियो यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीदेखील भेट घेतली.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.