नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखे मोहन भागवत यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाने देशभरात ८२० लोकांचा जीव घेतला आहे. भागवत यांनी लोकांना ऑनलाईन संबोधित केले. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले.
यावेळी भागवत यांनी लोकांना घरात राहण्याचे महत्व पटवून दिले. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केल्याने आपण कोरोनाचा सामना करू शकतो, भारतात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. आपण ही लढाई घरात राहून जिंकू शकतो. असेही भागवत यांनी सांगितले.
भागवत यांनी पालघरमध्ये जमावाने दोन संतांची हत्या केली, यावरही टिप्पणी केली. त्यांनी सर्वांना राग आटोक्यात ठेवण्याची विनंती केली. त्या संतांनी कोणालाही कसलीही हानी पोहोचवली नव्हती, असेदेखील नमुद केले.
कोरोना नावाच्या या महामारीने आपल्याला स्वदेशी वस्तू वापण्याची चांगली संधी दिली आहे, स्वावलंबी असणे गरजेचे आहे, असे भागवत म्हणाले.
भागवत पुढे सांगतात, लॉकडाऊनमुळे हवा आणि पाणी स्वच्छ होत आहे. प्रदुषणाची पातळी कमी झाली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आपण रोजगारनिर्मिती कशी करू शकतो, याबद्द आपण विचार करण्याची गरज आहे.
हा समाज आपला आहे, हा देश आपल्या आहे आणि त्यासाठीच आपण काम करतोय. हा आजार नवीन असून आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. आपण सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करायचे आहे. तसेच गरजुंना मदत करा, असे आवाहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे सर्व कार्यक्रम ३० जूनपर्यंत स्थगित केल्याचे भागवत यांनी सांगितले.