ETV Bharat / bharat

घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच महिला ठार - हैदराबाद छत कोसळून पाच ठार

घरातील एका व्यक्तीच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. रात्री एकाच खोलीमध्ये सुमारे ११ लोक झोपलेले असताना, छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली...

Five of family die as roof of house collapses in Telangana
घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच महिला ठार
author img

By

Published : Oct 25, 2020, 10:38 AM IST

Updated : Oct 25, 2020, 11:55 AM IST

हैदराबाद : तेलंगणाच्या वनापार्थी येथे एका घराचे छत कोसळून पाच महिलांचा मृत्यू झाला. या सर्व महिला एकाच कुटुंबातील होत्या, तसेच या दुर्घटनेत घरातील इतर सदस्यही जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील एका व्यक्तीच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. रात्री एकाच खोलीमध्ये सुमारे ११ लोक झोपलेले असताना, छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांमध्ये हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे घराचे छत कमकुवत होऊन ते कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच, मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत.

हेही वाचा : अत्याचारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीला टेरेसवरुन फेकले; उत्तर प्रदेशमधील घटना

Last Updated : Oct 25, 2020, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.