पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भाजप आणि जनता दलाने (यू) युती केली आहे. बिहार निवडणूकीत भाजपला सर्वाधिक अपेक्षा असून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एनडीएकडून मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात आहे. मात्र, प्रचार करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा वापर केला जात आहे. यावरून राष्ट्रीय जनता दलाने निशाणा साधला. 'बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायचा, पंतप्रधान नाही', असे टि्वट आरजेडीने केले आहे.
-
बिहार में मुख्यमंत्री चुना जाना है प्रधानमंत्री नहीं pic.twitter.com/5LdcXJDqzz
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बिहार में मुख्यमंत्री चुना जाना है प्रधानमंत्री नहीं pic.twitter.com/5LdcXJDqzz
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) October 25, 2020बिहार में मुख्यमंत्री चुना जाना है प्रधानमंत्री नहीं pic.twitter.com/5LdcXJDqzz
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) October 25, 2020
'ज्यांना धमकावण्याचे राजकारण आवडते, त्यांनी ते करावे. मात्र, आम्ही बिहारी लोक घाबरणारे नसून निर्भय, सकारात्मक आहोत. बिहारी लोक डोंगर फोडून रस्ता निर्माण करणारे आहेत. नकारात्मक सरकारांमुळे बिहारवासी कंटाळले आहेत. आता फक्त रोजगार, नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या गोष्टी होतील, असे टि्वट आरजेडीने केले आहे.
बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.