ETV Bharat / bharat

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्यंचा राजीनामा, कारण अस्पष्ट - viral acharya

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे.

विरल आचार्य
author img

By

Published : Jun 24, 2019, 10:12 AM IST

Updated : Jun 24, 2019, 11:22 AM IST

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. त्यांची नियुक्ती 2017 मध्ये झाली होती.

उर्जित पटेल यांना आरबीआयचे गव्हर्नर केल्यानंतर 23 जानेवरी 2017 मध्ये आचार्य यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली होती. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 आरबीआयच्या स्वायत्ततासह अनेक विषयांवर सरकारच्या वाढत्या मतभेदांमुळे राजीनामा दिला होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तीकांत दास यांना नियुक्त करण्यात आले आहे.

आचार्य यांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे मुंबई आयआयटीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएचडी केली. पीएचडीनंतर २००१ ते २००८ या काळात त्यांनी ‘लंडन बिझनेस स्कूल’मध्ये काम केले. बँक ऑफ इंग्लंड, तसेच बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या फेलोशिपही त्यांना मिळाल्या आहेत. 2017 मध्ये आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती झाली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.