वॉशिंग्टन (डी.सी.) - पोषक तसेच आवश्यक आहार न मिळाल्यास रोगांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार याचे प्रमाण दहा टक्क्यांवरून 37 टक्क्यांवर गेले आहे. या मागील मुख्य कारण आर्थिक परिस्थिती असल्याने गरीब कुटुंबांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
कॅनडीयन मेडीकल असोसिएशनच्या प्रकाशित करण्यात आलेल्या जर्नलमध्ये संबंधित बाब समोर आली आहे. अकाली मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये अन्नसुरक्षेच्या बाबतीत कमतरता असल्याचे समोर आले आहे. यानुसार संबंधित शरिराशी निगडीत तक्रारी असलेल्या व्यक्ती नऊ वर्षे आधीच दगावतात. हे प्रमाण अन्न सुरक्षेचे कवच असणाऱ्या व्यक्तींमध्ये कमी असल्याचे मत डॉ. फेई मेन यांनी मांडले आहे. ते टोरोन्टो विद्यापीठात संशोधक आहेत.
संशोधकांनी 2005 ते 2017 या वर्षांमधील कॅनेडीयन कम्युनिटी हेल्थ सर्व्हे तर्फे पाच लाखांहून अधिक तरुणांचे सर्वेक्षण केले. यामध्ये संशोधकांनी आहार व मुलांना मिळणाऱ्या पोषणानुसार त्यांचे गट तयार केले.
यामध्ये कमी, मध्यम तसेच पोषक अन्नापासून संपूर्णपणे वंचित असणाऱया बालकांचा अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणाच्या अंती समोर आलेल्या माहितीत यामधील 25,460 जणांचा अकाली मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच संबंधित आकडेवारीत पोषक अन्न न मिळालेल्या व्यक्तींचे आयुर्मान अन्य व्यक्तीपेक्षा नऊ वर्षांनी कमी असल्याचे सिद्ध झाले आहे. 2008 ते 2014 मध्ये कॅनडातील सरासरी आयुर्मान 82 वर्षे होते. यााधी होणारे मृत्यू अकाली (प्रि-मॅच्युअर) मानण्यात येतात.