ETV Bharat / bharat

बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल्यास नेत्यांना पदच्युत करावे - सुब्रह्मण्यम स्वामी

'ज्या राजकीय नेत्यांवर प्राथमिक चौकशीत बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल असेल, अशा नेत्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. उलट, या नेत्यांना सेलिब्रेटीचाच दर्जा मिळतो,' असे ट्विट स्वामींनी केले आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी
सुब्रह्मण्यम स्वामी
author img

By

Published : Dec 8, 2019, 12:31 PM IST

नवी दिल्ली - हैदराबादमध्ये बलात्कार करून हत्या करणारे चार आरोपी एन्काऊंटरमध्ये मारले गेले. यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर अनेक नेत्यांवरही बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवरही कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. नुकतीच सुब्रह्मण्यम स्वामींनीही ही मागणी उचलून धरली आहे.

बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल्यास नेत्यांना पदच्युत करावे

स्वामींनी ट्विट करत भ्रष्ट नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भ्रष्ट नेत्यांबाबतीत विनाकारण सहिष्णुता दाखवली जात असल्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.'ज्या राजकीय नेत्यांवर प्राथमिक चौकशीत बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल असेल, अशा नेत्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. उलट, या नेत्यांना सेलिब्रेटीचाच दर्जा मिळतो,' असे ट्विट स्वामींनी केले आहे.

याआधी उत्तर प्रदेशचा भाजप नेता कुलदीप सिंह सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो सध्या तुरुंगात आहे. त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी ते ट्विट काढून टाकले होते. यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींसह अन्य विरोधी पक्षांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते.

भाजप खासदार साक्षी महाराजांच्या उन्नाव बलात्काराचा गुन्हेगार आमदार सेंगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Intro:Body:

बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल्यास नेत्यांना पदच्युत करावे - सुब्रह्मण्यम स्वामी

नवी दिल्ली - हैदराबादमध्ये बलात्कार करून हत्या करणारे चार आरोपी एन्काऊंटरमध्ये मारले गेले. यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर अनेक नेत्यांवरही बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवरही कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. नुकतीच सुब्रह्मण्यम स्वामींनीही ही मागणी उचलून धरली आहे.

स्वामींनी ट्विट करत भ्रष्ट नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भ्रष्ट नेत्यांबाबतीत विनाकारण सहिष्णुता दाखवली जात असल्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

'ज्या राजकीय नेत्यांवर प्राथमिक चौकशीत बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल असेल, अशा नेत्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. उलट, या नेत्यांना सेलिब्रेटीचाच दर्जा मिळतो,' असे ट्विट स्वामींनी केले आहे.

याआधी उत्तर प्रदेशचा भाजप नेता कुलदीप सिंह सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो सध्या तुरुंगात आहे. त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी ते ट्विट काढून टाकले होते. यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींसह अन्य विरोधी पक्षांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.