ETV Bharat / bharat

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नव्हते इच्छुक.. 'या' कारणामुळे अखेर झाले तयार !

येत्या काळात काही अनपेक्षित घडलं नाही, तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याबाबत संभ्रमात होते.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:27 PM IST

मुंबई - येत्या काळात काही अनपेक्षित घडलं नाही, तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याबाबत संभ्रमात होते. अखेरीस शरद पवारांच्या आदेशानंतर ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यास राजी झाले.

मागील शुक्रवारी जेव्हा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे नेते नेहरु सेंटर येथे पहिल्यांदा भेटले. तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. जोपर्यंत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत नाहीत, तोपर्यंत नव्याने स्थापन होणार सरकार स्थिर राहणार नाही, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत होते. काँग्रेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्री आहेत, तर राष्ट्रवादीच्या गोटात दोन माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यासोबतच दोन्ही पक्षांमध्ये अनेक माजी मंत्री आहेत. त्यांचा सरकार चालवण्याचा अनुभव शिवसेनेतील नेत्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सरकारचे नेतृत्त्व करावे, असे राष्ट्रवादीचे देखील मत बनले.

नवाब मलिक बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना

महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी संभ्रमात होते. त्यावेळी शरद पवारांनी बैठकीतून बाहेर येत सरकारचे नेतृत्त्व करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत होत असल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या हे मान्य केले नव्हते. मात्र, मागील शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरेंच्या वतीने ही माहिती दिली होती. कदाचित दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वत: ही माहिती दिली असती. मात्र, त्याच रात्री अजित पवार भाजपला जाऊन मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ झाली.

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण? हा विषय तिन्ही पक्षांच्या बैठकीत चर्चेला आला. या बैठकीत ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी मनाने पुर्णतहा तयार नसल्याचे समोर आले. त्यावेळीही शरद पवारांनी यात हस्तक्षेप केला. बाळासाहेब ठाकरेंबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबधाचा पाढा पवारांनी वाचून दाखवला. राजकीय मतभेद असतानाही मी आणि बाळासाहेब ठाकरे चांगले मित्र होतो. बाळासाहेब ठाकरे आज ह्यात असते तर त्यांनाही आनंद झाला असता, असे पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकाला ज्या साध्या भाषेत समजते त्या भाषेत मुख्यमंत्री पद सांभाळण्याचा आदेश उद्धव ठाकरेंना दिला.

मागील तीन दिवसात स्वत:च्याच पुतण्याने बंड पुकारले तरी तिन्ही पक्ष एकत्र राहतील याची काळजी शरद पवार यांनी एकट्याने घेतली. सर्व राष्ट्रवादी पक्ष स्वत:मागे आणि शिवसेनेमागे असल्याचे शरद पवारांनी दाखवून दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांच्या आदेशाला नकार देणे उद्धव ठाकरेंना अशक्य होते. त्यामुळे मुख्यमंत्री पद स्विकारण्यास उद्धव ठाकरे तयार झाले. महाविकास आघाडीने सर्वानुमते निर्णय घेत पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारण्यास उद्धव ठाकरे का तयार नव्हते? यामागे चार कारणे आहेत.

१) सत्तेपासून दुर राहून सत्ता नियंत्रित करण्याची प्रथा ठाकरे कुटुंबियांत आहे. जबाबदारी शिवाय सत्ताकेंद्र हातात ठेवण्याची कल्पना त्यांना आकर्षीत करत असावी. कधीही सत्तेत येणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते सत्तेपासून कायम दुर राहीले. बाळासाहेब ठाकरे दुर राहुन पक्षातील आणि त्यांच्याच सरकारमधील गोष्टी नियंत्रित करण्यात आनंद मानत असत. तसेच सरकारचा 'रिमोट कंट्रोल' माझ्या हातात असल्याचेही ते कायम म्हणत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग निवडला होता. मात्र, उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होत असल्याने यात खंड पडला. दुर राहुन सत्ता नियंत्रित करणे उद्धव ठाकरेंना जास्त आवडले असते.

२) वैचारिकदृष्या तिन्ही पक्षांची म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारधारा भिन्न आहे. शिवसेनेने भुतकाळात उघडपणे राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर टीका केली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन होणारी महाविकास आघाडी खिळखिळी असेल. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान होवून भाजपसारख्या विरोधी पक्षाला सामोरे जाणे सोप नाही, हे उद्धव ठाकरे जाणून आहेत.

३) उद्धव ठाकरेंकडे प्रशासन चालवण्याचा कसलाच अनुभव नाही. एमबीएची पदवी आणि मोदी- शहांचा पाठीवर हात असतानाही नोकरशाहीला नियंत्रणात ठेवणे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांना शेवटपर्यंत अवघड गेले. अशा अडचणी मलाही येतील हे उद्धव ठाकरे जाणून आहेत, मात्र, त्यांना सामोर जाण्यासाठी ते तयार नाहीत.

४) उद्धव ठाकरेंना आरोग्याच्या समस्या आहेत. २०१६ साली त्यांची 'अँजिओप्लास्टी सर्जरी' झाली आहे. तेव्हापासून त्यांची काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी करते.

अखेरीस उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी का स्वीकारली?

शरद पवारांचा आदेश उद्धव ठाकरे नाकारु शकत नव्हते. आताच्या घडीला तरी शरद पवार मनापासून शिवसेनेला पाठिंबा देत आहेत. पवारांचा पाठिंबा आणि सहकार्याचाही फायदा उद्धव ठाकरे घेत आहेत.

शिवसेना पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार निवडणे उद्धव ठाकरेंसाठी सोपे काम नव्हते. एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्षात वाढत असलेला प्रभाव पक्षातील अनेक जुन्या नेत्याच्या पचणी पडत नाही. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकपक्षीय सरकार चालवण्याचीही क्षमता नाही. तीन पक्षाचे सरकार चालवणे ही तर लांबची गोष्ट आहे.

५१ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा सत्तेचे राजकारण तिरस्करणीय असल्याचे म्हणत बाळासाहेब ठाकरे सत्तेपासून दुर राहिले. त्यांचा नातू आदित्य ठाकरे आमदार होवून नुकताच सत्तेच्या राजकारणात सामील झाला आहे. आता उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होऊन यात प्रवेश करत आहेत.

Intro:Body:

'पानिपत'च्या लूकवरून ट्रोल झालेल्या अर्जुन कपूरने अखेर सोडले मौन

मुंबई - बॉलिवूडचे बरेच कलाकार काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. अभिनेता अर्जुन कपूरही याच ट्रोलिंगमुळे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा आगामी 'पानिपत' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुनच्या लूकवरून काही जणांनी त्याला ट्रोल केलं. या ट्रोलिंगवर अखेर अर्जुन कपूरने मौन सोडलं आहे.

'पानिपत'च्या लूकवरुन ट्रोल होणाऱ्या अर्जुनने म्हटलं की 'सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करण्याची लोकांना सवय झाली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपली नकारात्मक टीका व्यक्त करत असतात. मी अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, एतिहासिक व्यक्तींनी आपल्या प्राणाची बाजी लावून इतिहासात नाव अजरामर केले आहे. अशा व्यक्तींचा तरी आदर ठेवावा', असे त्याने म्हटले आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. ही लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.