नवी दिल्ली - यावर्षी रब्बी हंगामात गहू उत्पादन पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशात सातत्याने चौथ्यांदा विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 107.2 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. जे चौथ्या आणि अंतिम अंदाजात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
हरियाणामधील करनाल येथील देशातील एकमेव गहू संशोधन संस्थेने विकसित केलेल्या गहूंच्या निरनिराळ्या जातींमध्ये सलग चौथ्यांदा विक्रमी गव्हाचे योगदान आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, जर हवामान अनुकूल असेल तर या वेळी गहू उत्पादन 110 दशलक्ष टनपेक्षा अधिक होऊ शकले.
यावर्षी देशात गहू लागवडीचे क्षेत्र वाढल्याने गहू विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणाले की ,जानेवारी अखेरपर्यंत 3 कोटी 36 लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली होती. तर मागील वर्षात 2 कोटी 99 लाख इतके होते. त्याव्यतिरिक्त संस्थेने गव्हाचे अनेक प्रकार विकसित केले आहेत. हे केवळ जास्त उत्पादन देत नाही, तर पाणी आणि रोगाचा प्रतिबंध देखील कमी करते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात हे वाण लावले. ज्यामुळे या वेळी गव्हाच्या उत्पादनाची जास्त नोंद झाली आहे.
कोरोना काळात शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास आली आहे. शेती ही केवळ अर्थव्यवस्थेची गती वाढवू शकते. हे असे एक क्षेत्र आहे, जे आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देईल. कोरोनापासून घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्याकडे पुरेशा अन्नाचा साठा आहे, असे ज्ञानेंद्र प्रताप यांनी सांगितले.